आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biggest Sriram Temple Builds In Amritsar, Total Expenditure 15 Crore Rupees

मुंबई, नागपूरपेक्षा भव्य श्रीराम मंदिर अमृतसरमध्ये साकारणार; खर्च एकूण 15 कोटी रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - देशातील भव्य दिव्य श्रीराम मंदिरांमध्ये अमृतसरमधील मंदिराचा लवकरच समावेश होणार आहे. या ठिकाणी भगवान श्रीरामाचे समग्र जीवनदर्शन एकाच छताखाली अनुभवता येणार आहे. भाविकांना श्रीरामाचे जीवनदर्शन पाहता, ऐकता व वाचता येणार आहे. शिवाला बाग भाइयांच्या श्रीराम दर्शन मंदिरात ओडिशा, राजस्थान, तामिळनाडूच्या वास्तुकलेचा वापर करण्यात आला आहे.


देशातील श्रीरामाचे प्रमुख मंदिर : नागपूर येथील पोद्दारेश्वर आणि मुंबईच्या माटुंगा भागातील राममंदिर देशात मोठे मानले जातात. या यादीमध्ये आता अमृतसरच्या मंदिराचा समावेश होणार आहे. मंदिर ट्रस्टचे तत्कालीन प्रमुख स्व. डॉ. हरबिलास राय तसेच सचिव स्व. राजकुमार शर्मा यांनी 2005-06 मध्ये मंदिर बांधकामास सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या हयातीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही.


श्रद्धेचे प्रतीक उभारले
ट्रस्टचे प्रमुख रामपाल चतरथ यांनी सांगितले की, मंदिरासाठी जमीन खरेदी करण्याचा विचार पुढे आला तेव्हा ट्रस्टकडे पैसे नव्हते. अशा स्थितीत दोघा जणांनी आपले घर गहाण ठेवून पैसा उपलब्ध केला.


शिल्पकलेचा अप्रतिम नमुना
लाल, गुलाबी आणि पांढ-या संगमरवराने तयार होणा-या मंदिरावर ओडिशा शैलीतील तीन मोठे घुमट आहेत. घुमटासमोर राजस्थानच्या हवामहालासारखी एक मोठी व चार छोट्या मेघडंबरी आकर्षणाचे केंद्र आहे.
जमीन खरेदी करून मंदिराचे काम सुरू झाले. यादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. ट्रस्टचे प्रमुखपद आल्यानंतर त्यांच्या घरावरील बोजा नाहीसा करण्यात आला व घरे त्यांच्या वारसांना देण्यात आली.


आतापर्यंत 7 कोटी खर्च
साधारण 3,300 चौ. फूट जागेवर निर्माण होत असलेल्या या मंदिरावर 15 कोटी रुपये खर्च होतील, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, आतापर्यंत 7 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मंदिर 110-120 फूट उंच असेल, असे रामपाल चतरथ यांनी सांगितले.


खास वैशिष्ट्ये
तळघरासह मंदिर चार मजली आहे. तळघरात योगा हॉल, मेडिटेशन सेंटर आणि प्रवचन कक्ष असेल. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक प्रवचन कथाच्या धर्तीवर ते तयार केले जात आहे. दुस-या व तिस-या मजल्यावर ऑडिओ-व्हिडिओ सिस्टिम असेल. यामध्ये भगवान श्रीरामाचे समग्र जीवनदर्शन डिजिटल फोटोग्राफीद्वारे दाखवण्यात येईल. चित्रांशी संबंधित वर्णन भाविकांना ऐकता व वाचताही येईल. मंदिराच्या चौथ्या मजल्यावर श्रीराम दरबार असेल. या ठिकाणी श्रीरामाच्या विशाल मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. श्रीरामाच्या दोन्ही बाजूस भगवान वाल्मीकी व तुलसीदासाची मूर्ती असेल.