आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIHAR SPL: पाच दिवसांवर आली बिहारची \'दिवाळी\', कोणाचे निघणार \'दिवाळे\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहार विधानसभा निवडणुकीचा अखेरचा पाचवा टप्पा जवळ आला आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान 5 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी शांत होतील. त्यानंतर दिवाळीच्या तीन दिवस आधी अर्थात 8 तारखेलाच बिहारमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र बिहारमध्ये दिवाळी कोण साजरी करणार आणि कोणाचे 'दिवाळे' निघणार यासाठी आपल्याला 8 तारखेपर्यंत सबुरी ठेवली पाहिजे.
देशभरातील मुद्दे बिहारमध्ये गाजले
बिहार विधानसभा निवडणूक आणि देशात विविध प्रश्नांवर विरोधकांसह साहित्य-संस्कृती-चित्रपट क्षेत्रातील मंडळींचा आक्रोश यांचा परस्पर काही संबंध आहे का ? तर नक्कीच आहे, असेच म्हणावे लागत आहे. देशात जो मुद्दा उपस्थित होत आहे तो बिहारच्या निवडणूकीत कळीचा ठरत आहे. बीफ पासून आरक्षणापर्यंत आणि तंत्र-मंत्र, भूत-पिशाच्चंपासून बाबा-बुवांच्यासोबत नेते काय करत आहेत असे अनेक मुद्दे आतापर्यंत बिहारच्या विधानसभा निवडणूकीत उपस्थित झाले आहेत. यातून बिहारी जनतेला काय मिळाले हे त्यांनाच ठाऊक ज्यांनी नॉन इश्यूजला इश्यू केले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, अखेरच्या टप्प्यात कोणता मुद्दा गाजत आहे