आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य मर्डर: JDU आमदारच्या मुलासह तिघांना जन्मठेप, पतीला यासाठी 5 वर्षे कैदेची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुन्हेगारांना शरण दिल्याने बिंदी यादवला 5 वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. - Divya Marathi
गुन्हेगारांना शरण दिल्याने बिंदी यादवला 5 वर्षे कैदेची शिक्षा सुनावली.
गया - बिहारच्या आदित्य सचदेवा हत्याकांडात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने संयुक्त जनता दलाच्या माजी आमदार मनोरमा देवींचा मुलगा रॉकीसह 3 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मनोरमा देवींचा पती बिंदी यादव याला 5 वर्ष कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 5 मे 2016 रोजी हायवेवर घडली होती. आदित्यने रॉकीच्या गाडीला साइड दिली नाही म्हणून संतप्त रॉकीने गोळी मारुन त्याची हत्या केली होती. कोर्टाने 31 ऑगस्ट रोजी रॉकीसह तीन जणांना या हत्याकांडात दोषी ठरविले होते. 
 
गुन्हेगारांना शरण दिल्याने बिंदीला शिक्षा 
- आदित्य सचदेवे हत्या प्रकरणात जदयूच्या माजी आमदार मनोरमादेवी यांचा मुलगा रॉकीसह चार आरोपींना 31 ऑगस्ट रोजी दोषी ठरवण्यात आले होते. 
-  सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार या प्रकरणाची सुनावणी 15 महिने 23 दिवसांत पूर्ण करण्यात अाली. 
- दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर मृत अादित्यची अाई चांद सचदेव यांनी न्यायपीठाचे अाभार मानत हा एक माेठा व महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय व परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात अाली हाेती.
 
सर्व आरोपींवर विविध कलमे 
- या प्रकरणात राॅकी यादवसह त्याचे वडील बिंदी यादव, अंगरक्षक व एक नातेवाईक टोनी यादव यांनाही दाेषी ठरवण्यात अाले. मात्र, सर्वांना वेगवेगळी कलमे लावण्यात अाली अाहेत. 
- राॅकी व त्याच्या अंगरक्षकाला हत्येचे कलम लावण्यात अाले. 
- रॉकीचे वडील आणि मनोरमादेवीचे पती बिंदी यादव यांच्यावर गुन्हेगारांना शरण दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यांना 5 वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. 
 
फितूर झाले हाेते अादित्यचे मित्र
अादित्यसाेबत असलेल्या त्याच्या चार मित्रांनी घटनेचे समर्थन केले; परंतु अाराेपींना अाेळखण्यास असमर्थता दर्शवली. तसेच न्यायालयात साक्षीदरम्यानही त्यांनी अाराेपींना अाेळखण्यास नकार दिला. त्यावर अादित्यच्या अाईने साक्षीदारांबाबत नाराजी व्यक्त केली व अादित्यच्या मित्रांची काय मजबुरी हाेती? असा प्रश्न उपस्थित केला हाेता.
 
अशी घडली हाेती घटना
7 मे 2016 राेजी बाेधगयाहून परतताना राेडरेजदरम्यान अादित्यची गाेळी घालून हत्या करण्यात अाली हाेती. अादित्यसाेबत कारमध्ये त्याचे चार मित्रदेखील हाेते. याप्रकरणी हत्येचा अाराेप जनता दल (यु.)च्या अामदार मनाेरमादेवी यांचा मुलगा राॅकी व त्याच्या अंगरक्षकावर लावण्यात अाला हाेता. घटनेनंतर पक्षाने मनाेरमादेवी यांना निलंबित केले हाेते. या प्रकरणातील अाराेपानुसार अादित्यने राॅकीच्या लँडराेव्हर गाडीला पुढे अधिक वाहने असल्याने बाजू दिली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या राॅकीने पुढे जाऊन अादित्यच्या गाडीला अाेव्हरटेक केले. त्यानंतर दाेघांत वाद झाला. तसेच जाेदार मारहाणदेखील झाली. यादरम्यान राॅकीने अादित्यवर गाेळी झाडली. ही गाेळी त्याच्या डाेक्याला लागल्यामुळे ताे जागीच ठार झाला हाेता.
 
मनोरमादेवी आणखी अडकण्याची शक्यता 
 - जेडीयूमधून निलंबित मनोरमा देवी यांच्या संकटात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रॉकीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी घरातून अवैध दारु जप्त केली होती. या प्रकरणीही याच महिन्यात निर्णय येण्याची आपेक्षा आहे. 
 - अवैध दारु सापडल्याप्रकरणी पोलिसांनी रॉकी आणि बिंदी यादव यांना आरोपी केले होते. विशेष म्हणजे या आरोपात मनोरमादेवींना तुरुंगातही जावे लागले होते. 
 - याशिवाय बिंदी यादववर बोधगया पोलिस स्टेशनमध्ये धुडगूस आणि देशद्रोहाचाही खटला सुरु आहे. सरकारने याप्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिली असून आरोपपत्रही दाखल झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...