आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार: भाजपची अडचण वाढली, LJP ची अट तर RSLP ने उभा केला CM उमेदवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - बिहार विधानसभा निवडणूकीपूर्वीच एनडीएमध्ये वादाची शक्यता आहे. राज्यात भाजपाला दोन्ही समर्थक पक्ष लोक जनशक्ति पार्टी (लोजपा) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा) ने आघाडीसाठी नवीन अडचणी निर्माण केल्या आहेत. लोजपाने भाजपासमोर अट ठेवली आहे की, मांझी समर्थक आणि जदयूच्या पाच बंडखोर आमदारांना तिकीट देऊ नये. तर दूसरीकडे, रालोसपाने यापूर्वीच त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांना विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले आहे. तर भाजपाने पूर्वीच सांगितले आहे की, निवडणूकीच्या आधी मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही कोणाचेही नाव पुढे करणार नाही.

जदयूच्या बागींना मिळाले तिकिट, नात्यात आली कटूता
केंद्रात एनडीए सरकारचे मंत्री रामविलास पासवानच्या पक्षाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की, भाजपाने तिकीट दिले, तर आमच्या नात्यावर याचा फरक पडेल.मविलास पासवान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोजपाच्या प्रदेशाध्यक्ष पारस यांनी सांगितले की, ''लोजपा यांना तिकिट देण्याचा विरोध करणार आहे. भाजपाने जर या विरोधानंतरही या बागींना तिकिट दिले तर लोजपा त्या विधानसभा मतदार संघात त्यांचा उमेदवार उतरवेल. याची माहिती सुशील कुमार मोदी यांना देण्यात आली आहे. यावेळी रामविलास पासवानसुध्दा उपस्थित होते.