आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमधील औरंगाबादमध्ये भुसूरुंगाचा स्फोट, 8 पोलिस कर्मचारी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्यात भुसूरुंगाच्या स्फोटात 8 पोलिस कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एका पोलिस अधिका-यासह आठ पोलिस कर्मचारी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. मृतांबद्दल प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार औरंगाबादपासून जवळ असलेल्या नवीनगर येथे पेट्रोलिंगवरील पोलिस जीप नक्षलवाद्यांनी भुसुरंगात उडवून दिली. जीपमध्ये असलेले सर्व पोलिस कर्मचारी ठार झाले आहेत. आज (मंगळवार) 4 वाजता टंडवा पोलिस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गावातील पुल ओलांडताना ही घटना घडली.