आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS सुसाइड : पत्नीसोबतच्या भांडणाने होते त्रस्त, FB वर पत्नीसोबत फक्त एक फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बक्सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली होती. मुकेश पांडे यांच्या फेसबुक अकाऊंटनुसार त्यांच्या लग्नाची तारीख 18 नोव्हेंबर 2013 आहे. लग्नाला तीन वर्षे झाल्यानंतरही पत्नीसोबत त्यांचा फक्त एक फोटो फेसबुक अल्बममध्ये आहे. मुकेश यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्येही पत्नीसोबत चांगले संबंध नसल्याचे म्हटले आहे. 
 
फेसबुकवर 138 मित्र 
- मुकेश यांच्या फेसबुक अल्बममध्ये चार फोटो आहेत.  फेसबुकवर त्यांचे 138 मित्र होते.
- त्यात एक त्यांच्या शाळेतील ग्रुप फोटो आहे. एक कुटुंबासोबतचा फोटो आहे. तर, एक स्वतःचा प्रोफाइल फोटो आहे. 
- फेसबुकवर एकच फोटो पत्नीसोबतचा आहे. 
 
गुवाहाटीचे रहिवासी होते मुकेश पांडे 
- गुवाहाटीचे रहिवासी मुकेश पांडे 2012 बॅचचे आयएएस अधिकारी होती. त्यांना 14वी रँक मिळाली होती. 
- मुकेश यांचे वडील डॉ. सुदेश्वर पांडे आणि आई गीता पांडे हे न्यू गुवाहाटी येथील आनंद नगरमध्ये राहातात. त्यांचे मूळगाव हे सारण जिल्ह्यातील दरियापूरमधील सांझा येथे आहे. 
- मुकेश यांचे ग्रॅज्यूएशनपर्यंतचे शिक्षण गुवाहाटी येथे झाले. त्यांनी बीए ऑनर्स केले होते. 
- ग्रॅज्यूएशननंतर मुकेश दिल्लीला आले आणि लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करत होते. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी अधिक मेहनत केली आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. 
- मुकेश यांचे काका अनिल पांडे यांनी सांगितले की ते अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. मुकेश यांच्यासोबत शेवटची भेट पाटण्यात झाली होती. त्यांच्यासोबत फोनवर नियमीत बोलणे होते होते. 
- त्यांची काकू कौशल्या कुंअर यांनी सांगितले की कळतच नाही की त्यांनी हे पाऊल का उचलेल असेल. त्यांना काय त्रास होता हे  त्यांनी कधीही सांगितले नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुकेश पांडे यांच्याशी संबंधित फोटोज्... 
बातम्या आणखी आहेत...