आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Chief Minister Jeetan Ram Manjhi Visit At Ajijpur

दंगलीनंतर नमाज झाली नाही; पीडित महिलेने मुख्यमंत्र्यांना ऐकवली \'आपबीती\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- 'रविवारी (18 जानेवारी) आम्ही सगळे नमाज पठण करून घरी येत असताना गावात दंगल उसळ्याचे वाटेतच समजले. दंगलखोरांनी माझ्या डोळ्यासमोर माझ्या दोन्ही मुलांची निर्घृण हत्या केली. धारदार शस्त्राने सरफराज (14) आणि सैफू (10) या दोघांवर दंगलखोरांनी सपासप वार करत होते आणि मी उघड्या डोळ्यांनी सगळं पाहात होती. या घटनेनंतर मशिदीत नमाज पठण करण्यात आली नाही.' अशा शब्दात एका पीडित महिलेने राज्याचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना 'आपबिती' सांगितली.

बिहारमधील अजीजपूर येथील दंगलीच्या घटनेनंतर तिसर्‍या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पीडित लोकांचे सांत्वन केले. आजही परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सरैया प्रखंडमधील अजीजपूर बलिहारा गावात प्रेमासंबंधातून उसळलेल्या दंगली 40 घरे जाळण्यात आली होती. प्रियकर तरुणाची निर्घृण हत्या करण्‍यात आल्यानंतर दोन समुदायात दंगल उसळली होती. यात एका समुदायाच्या लोक वस्तीची राखरांगोळी झाली. यात चार जणांचा होरपळून मृत्यु झाला होता. अजीजपूर हे पाटण्यापासून 125 किलोमीटरवर आहे. 40 लोक अजूनही बेपत्ता असल्याचे एका पीडित महिलेने मुख्यमंत्री मांझी यांना सांगितले.
दंगलीत मुलगा आणि घर गमावलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, दंगलखोरांनी आम्हाला घराबाहेर काढले. आम्हाला सगळ्यांना थांबवून आमच्यासमोर घर पेटवून दिले. यापूर्वी घरात तोडफोड केली. धान्यांच्या पोत्यांना आग लावली. नंतर मुलाची हत्या केली. एवढे नव्हे तर वस्तीत महिलांची छेड काढत दंगलखोरांनी प्रत्येक घराला आग लावली. महिलांना अब्रु वाचवण्यासाठी जंगलात लपून बसावे लागले.
मुख्यमंत्री मांजी यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. यावर मांजी यांना पीडितांनी चांगलीच खरीखोटी सुनावली. मांझी यांना महिलांनी घेरले आणि नुकसानाची रक्कम न पोहोचल्याचा धक्कादायक खुलासा केला. एवढेच नाही ती प्रशासनाद्वारा वाटप करण्‍यात आलेल्या कांबळ देखील पीडितांपर्यंत पोहोचल्या नाहीत. आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली आहे.
अजीजपूरमध्ये तीन महिने डॉक्टरांचे मदत शिबिर सुरु राहाणार आहे. तसेच पीडितांना लवकर मदत दिली जाईल. कोणावरही अन्याय होणार नसल्याचे मुख्यमंत्री मांझी यांनी सांगितले.

लालू प्रसाद यादवांनी पीडितांचे केले सांत्वन...
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सुप्रीमो लालू प्रसाद यादव हे बुधवारी दुपारी अजीजपूर येथे पोहोचले. पीडित नागरिकांची लालूंनी भेट घेतली. सरकारने 73 पीडित कुटुंबाना 6 महिन्यांपर्यंत मोफत धान्य द्यावे, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी कली. घराची दुरुस्ती, नुकसान भरपाईची रक्कम आणि विधवांना पेंशन देण्याचीही मागणी लालूंनी यावेळी केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अजीजपूरमधील छाया‍चित्रे...