आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bihar Chief Minister Jitan Ram Manza News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी पूजा केल्यानंतर मूर्ती धुण्यात आली, बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - मधुबनी येथील एका मंदिरात माझ्या हातून पूजा झाल्यानंतर मंदिरातील मूर्ती धुण्यात आली होती. मला आजदेखील दलित समजले जाते, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आपला धक्कादायक अनुभव सांगितला. दलित समाजाने जाती-जातीत विभागण्यापेक्षा एकजूट होऊन राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी रविवारी एका कार्यक्रमात केले. देश एक ठेवायचा असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मांझी पुढे म्हणाले की, पूजेनंतर मूर्ती धुण्यात आल्याचे मी स्वत: बघितले नाही. फक्त ऐकले आहे. खणन मंत्री रामलषण राम रमण यांनी ते मला सांगितले आणि तेच मी लोकांसमोर मांडत आहे. या घटनेमुळे मला अतीव दु:ख झाले. अनुसूचित जातीत जन्माला आलो ही माझ्यासाठी चूक ठरली आहे. कोणी दलित तर माझ्या पाया पडत नाही. हद्द म्हणजे माझ्याकडे कामासाठी येणा-यांना माझ्या पाया पडण्यात काही अडचण वाटत नाही, पण त्याच्या मनात काय असेल हे मधुबनीतील घटनेतून मला लक्षात आले, असे मांझी यांनी म्हटले. आजही आम्ही कोठे आहोत त्याचा विचार करा. जातीपातीत वाटले गेल्याने हे चित्र आहे, असेही
मांझी म्हणाले.