आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Chief Minister Manjhi's Commission Statement Bring Him In Trouble

मांझींचे ‘कमिशन’ वादात, विकास प्रकल्पासाठी ‘कमिशन’ घेतल्याचे सार्वजनिक वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये वेगाने राजकीय स्थित्यंतरे होत असतानाच मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी विकास प्रकल्पासाठी कमिशन घेतल्याचे वक्तव्य करून नाटकाच्या नव्या राजकीय अंकाला सुरुवात केली, परंतु शुक्रवारी त्यांनी लगेचच घूमजाव करताना ते प्रतीकात्मक स्वरूपात बोललो होतो, असे म्हटले आहे.
मांझी यांनी कमिशन स्वीकारल्याचे कबूल केल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी जदयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी पत्राद्वारे केली आहे. पोलिस महासंचालक पी. के. ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८९, पुराव्यासंबंधीचा कायदा १८७२ अन्वये त्यांच्यावर कारवाई केली जावी, असे कुमार यांनी म्हटले आहे. मांझी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. अभियंते, तंत्रज्ञ पुलाच्या बांधकामाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवतात. त्या पैशांचा काही भाग कंत्राटदारांना मिळतो. एवढेच काय मलाही काही भाग मिळतो, असे मांझी यांनी म्हटले होते. त्यावर शुक्रवारी पत्रकारांनी छेडले असता मांझी यांनी ‘कमिशन’ उल्लेख प्रतीकात्मक आहे, असे स्पष्ट केले. सरकारी काम नेमके कसे चालते हे सांगण्यासाठी आपण हे वक्तव्य केले होते. मी कमिशन घेतलेले नाही, असा दावा मांझी यांनी केला.
दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी मांझी-मोदी यांच्यात चर्चा झाली होती, परंतु त्याचा तपशील अद्याप बाहेर का आला नाही, असा सवाल जदयूने केला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा घाट असल्याचा आरोप बसपा नेत्या मायावती यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवातून भाजपने काहीही बोध घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा पुढे, मुख्य प्रतोदावरूनही वाद