आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार-हार्दिक पटेल गुजरातमध्ये एकाच मंचावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे गुजरातमधील सौराष्ट्रातील एका सभेस हार्दिक पटेल याच्यासह २८ जानेवारी रोजी संबोधित करणार आहेत. पाटीदारांचे आरक्षण हा विषय त्यावेळी प्रामुख्याने असेल.
नितिश कुमार यांनी हे विशेष आमंत्रण पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या बोलवण्यावरुन स्वीकारले आहे, अशी माहीती जनता दल (जेडीयू) चे महासचिव के. सी. त्यागी यांनी आज येथे दिली. नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील या सभेस यामुळे राजकीय महत्व आले आहे.

महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ब्रिगेडीयर सुधीर सावंत आणि राजस्थानातील गुज्जर आंदोलनाचे नेते हिंम्मत सिंग हे देखील यावेळी उपस्थित राहतील. त्यागी पुढे म्हणाले, जदयू प्रमुखांनी सावंत आणि हिम्मत सिंग याचेही महाराष्ट्र आणि राजस्थानातील मेळाव्यांसाठीचे निमंत्रण स्वीकारले आहे. मात्र, त्या सभांची तारीख अद्याप निश्चित व्हावयाची आहे.
अखिल भारतीय पटेल नवनिर्माण सेना हार्दिक पटेल यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल व पाटीदार आंदोलनाला पाठींबा दिल्याबद्दल नितीशकुमार यांना धन्यवाद दिले आहेत. आणि त्यांना राजकारणातील महानायक हे उद् बोधन दिले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...