आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंसोबत विकास कसा करणार? नितीश म्हणाले - विषारी सापाचा चंदनावर परिणाम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे, मात्र अद्याप सत्ताधारी जनता दल (संयुक्त) (जेडीयू) आणि राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) सर्वकाही आलबेल दिसत नाही. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीशकुमार यांनी आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांना विषारी साप म्हटले आहे. मंगळवारी सोशल मीडिया यूजर्ससच्या प्रश्नांना उत्तर देताना नितीशकुमार यांनी केलेल्य ट्विटमुळे दोघांमध्ये वाद समोर आला आहे.
नितीशकुमार मंगळवारी सोशल साइट यूजर्सच्या प्रश्नांना उत्तर देत होते. एका यूजरने प्रश्न केला, की लालूंना सोबत घेऊन तुम्ही बिहारचा विकास कसा करणार ? त्याच्या उत्तरात नितीश यांनी ट्विट केले, 'बिहारचा विकास हे माझे आत्मिक कर्तव्य आहे.' त्यानंतर त्यांनी एक दोहा लिहिला - तो असा, "जो रहीम उत्तम प्रकृति, का करी सकत कुसंग। चंदन विष व्यापत नहीं रहे लिपटे रहत भुजंग।'' या दोह्याच्या माध्यमातून त्यांनी लालूंना विषारी साप म्हणत त्यांच्या संगतीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले.

नेत्याच्या अपमान सहन करणार नाही - आरजेडी
नितीशकुमार यांच्या ट्विटने आरजेडी आणि लालू समर्थक संतप्त झाले आहेत. नेत्याचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे आरजेडी प्रवक्त्यांनी म्हटले आहे. माजी खासदार राजनीती प्रसाद म्हणाले, 'नितीशकुमार अधून मधून अशी काव्यात्मक उदाहरणे देत असतात. पण अशी तुलना करणे बरे नाही. लालू यादवांनी बिहारचा जो विकास केला, तसा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. राजकारणात अशी उदाहरणे चालत राहातात, पण हे योग्य नाही.'
भाजपनेही दोह्यातूनच केली टीका
जेडीयू आणि आरजेडी यांच्या आघाडीवर भाजप सुरुवातीपासून टीका करत आली आहे. नितीशकुमारांच्या दोह्याने बिहारच्या राजकारणात चर्चेला नवा विषय मिळाला आहे. भाजपने नितीशकुमारांनी अर्धवट दोहा सांगितल्याचे म्हणत वाईट संगतीचा वाईटच परिणाम होईल असा सल्ला दिला आहे. भाजप प्रवक्ते रामेश्वर चौरासिया म्हणाले, ''संगत से गुण होत है, संगत से गुण जात। हे देखील नितीशकुमारांनी लक्षात ठेवले पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नितीशकुमारांचे ट्विट
बातम्या आणखी आहेत...