आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवर पसरला स्मृती इराणींचा अश्लिल फोटो, लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्याविरोधात FIR

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समस्तीपूर (बिहार) - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक बनावट अश्लिल फोटो सध्या व्हॉट्स अॅपवर पसरला आहे. हा फोटो पसरवण्याचा आरोप लोकजनशक्ती पक्षाच्या एका नेत्यावर करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लोजपचे समस्तीपूर शहराध्यक्ष उमाशंकर मिश्रा यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी शनिवारी मिश्रा यांची चौकशी केली.
काय आहे प्रकरण
समस्तीपूरमध्ये काही दिवसांपासून 'दोस्ती' नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर स्मृती इराणी यांचा मॉर्फ्ड अश्लिल फोटो सर्कुलेट होत होता. या ग्रुपचे अॅ़डमिन लोकजनशक्ती पक्षाचे नेते रवींद्रकुमार सिहं आहेत. तर, उमाशंकर मिश्रा यांच्यावर आरोप आहे, की त्यांच्या मोबाइलवरुन हा फोटो भाजप नेत्यांना पाठवण्यात आला. भाजप नेत्यांनी याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पुरावा म्हणून मिश्रा यांच्या मोबाइल क्रमांकावरुन आलेले फोटो जोडण्यात आले आहे. समस्तीपूर पोलिसांचा क्राइम सेल या प्रकरणी तपास करत आहे.
काय आहे भाजपचे म्हणणे
लोजप नेत्या विरोधात तक्रार दाखल करणारे भाजप नेते राजीव रंजन म्हणाले,की काही दिवसांपासून हा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. यातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. या फोटोवर अभद्र टिप्पणी देखील करण्यात आली आहे, आमची मागणी आहे, की लोकजनशक्ती पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दोषींवर कारवाई करावी. आरोपींची पक्षातून हकालपट्टी करावी.
काय आहे आरोपी नेत्यांचे म्हणणे
लोकजनशक्ती पक्षाचे नेते उमाशंकर मिश्रा यांचे म्हणणे आहे, की मी शहराध्यक्ष आहे. माझ्या कार्यालयात शेकडो लोक येत-जात असतात. हे माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आले आहे. मिश्रा यांचे म्हणणे आहे, की भाजप आणि लोजपच्या आघाडीत वितूष्ट निर्माण करण्यासाठी माझ्या मोबाइलचा वापर करण्यात आला असला पाहिजे.
फाइल फोटो - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान.
पुढील स्लाइडवर, भाजपने दिलेली तक्रार