आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पाटण्यात भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, अर्ध्यातासांनी होती \'चाय पे चर्चा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारची राजधानी पाटण्यात कदमकुआँ भागात गुरुवारी एका भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी साडे सहा वाजता ही घटना घडली. विशेष म्हणजे, आर्ध्या तासानंतर येथे स्थानिक भाजप आमदार नितीन नवीन यांच्यासोबत चाय पे चर्चा कार्यक्रम होणार होता. हत्येच्या घटनेनंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव अविनाशकुमार असल्याचे सांगितले गेले आहे. आमदार नवीन यांचा तो निकटवर्तीय मानला जात होता. अविनाशकुमारकडे पाटणा भाजप महामंत्री पदाची जबाबदारी आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.

कसा झाला हल्ला
भाजप नेत्यावर सालिमपूर अहरा मार्गावर हल्ला झाला. अविनाश सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते. हल्लेखोरांना पाहून त्यांनी पळ काढला मात्र त्यांचा पाठलाग करुन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अविनाश यांना पाच गोळ्या लागल्या. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर निघून गेले मात्र, पुढे जाऊन ते परत मागे आले आणि अविनाश यांच्या डोक्यात गोळी झाडली. अविनाशचे शरीर हलवून जिवंत आहे की नाही हे तपासून पाहिले आणि त्यानंतर हल्लेखोर फरार झाले.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
अविनाशकुमार यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरु केली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस माजी नगरसेवक पन्नालाल गुप्ता, घटनास्थळापासून जवळ असलेल्या मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलाला चौकशीसाठी घेऊन गेले.
विधानसभेतही चर्चा
भरदिवसा हल्ला झाल्याने लोक संतप्त झाले आहेत. संतप्त जमावाने अविनाश यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्तारोको केला. त्यानंतर पोलिस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुन मृतदेह रस्त्यावरुन हलवला. पोलिसांनी 48 तासांत आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले आहे. या हत्येचे पडसाद बिहार विधानसभेत उमटले आहेत. भाजप सदस्यांच्या गोंधळामुळे पहिले सत्र रद्द करण्यात आले.

सुशील मोदी म्हणाले, बिहारमध्ये पुन्हा जंगल राज
भारतीय जनता पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी आणि शाहनवाज हुसैन यांनी भरदिवसा झालेल्या भाजप नेत्याच्या हत्येवरून मुख्यमंत्री नितीशकुमारांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, 'राज्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. राज्य सरकार गन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरली आहे. बिहारमध्ये जंगल राज आले आहे.' तर, शाहनवाज हुसैन म्हणाले, की नितीशकुमारांनी आता सुशासनाचे पोस्टर उतरवले पाहिजे. गृहखाते त्यांच्याकडेच आहे, तरीही गुन्हे घडत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, घटनेशी संबंधीत फोटो
बातम्या आणखी आहेत...