आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Crime News Every Night Dinner Warts Sexual Abuse Including Cocaine

आई-वडिल दिल्लीत नोकरीला; मुलीला सोडले पाटण्यात, मावसाच्या वासनेची झाली शिकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - बिहारची राजधानी पाटणामध्ये मेहुण्याकडे मुलीला ठेवले असताना सख्ख्या मावसाने अर्थात मुलीच्या मावशीच्या नवर्‍याने नववीत शिकत असलेल्या मुलीला जेवणातून गुंगीचे औषध देऊन चार महिने लैंगिक शोषण केले. पाटण्यातील शास्त्रीनगर येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची आपबीती ऐकल्यानंतर पोलिस देखील चक्रावून गेले. पीडित मुलीने मावसाला विरोध केल्यानंतर तो नराधम तिचे हातपाय बांधून अत्याचार करत होता. तिला मारहाण करत होता.
आरोपी पाटण्यात वरिष्ठ पदावरील सरकारी कर्मचारी आहे. पीडित मुलगी शुक्रवारी शहर पोलिस आयुक्त शिवदीप लांडे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेली. तिथे तिने सर्व हकिकत कथन केली. त्यांनी तिला शास्त्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास पाठवले.
असा झाला खुलासा
पीडितेने सांगितल्यानुसार, रोज सकाळी उठल्यानंतर तिला तिचे कपडे अस्ता-व्यस्त झालेले दिसत होते. तर, अनेकदा कपडे उतरवलेले राहात होते. डोके जड पडलेले असायचे आणि कायम झोप येत राहात होती. एक दिवस तिला कळाले की आपल्या जेवणामध्ये गुंगीचे औषध मिसळले जाते, त्यामुळे एवढी झोप लागत आणि शुद्ध राहात नाही. त्यानंतर तिचा सख्खा मावसा तिच्यासोबत कुकर्म करत होता.
महिला कॉन्स्टेबलसोबत राहाते मुलगी
मुलीला मावसाचा खरा चेहरा कळाल्यानंतर तिने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिचे हात-पाय बांधून तिच्यासोबत दुष्कर्म करण्यास सुरुवात केली. या अत्याचाराला कंटाळून शुक्रवारी ती शहर पोलिस आयुक्त शिवदीप लांडे यांच्या कार्यालयात पोहोचली. लांडे यांनी तत्काळ तिला महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत शास्त्रीनगर पोलिस स्टेशनला पाठवले. सथ्या मुलगी महिला कॉन्स्टेबलसोबत तिच्याच घरात राहात आहे. कोर्टासमोर तिचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. दिल्लीत राहात असलेल्या तिच्या आई-वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
पीडितेने सांगितले, की तिचे आई-वडील दिल्लीत नोकरी करतात. मावसाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते दिल्लीत शिक्षण घेतात. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतर त्याला अटक केली जाईल.