आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये विषारी दारुचे 13 बळी, राज्यात चार महिन्यांपासून बंद आहे अल्कोहोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशासनाने अजून दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. - Divya Marathi
प्रशासनाने अजून दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
पाटणा - बिहारमधील गोपलगंज येथे पोटदुखी आणि उलटीचा त्रास होत असलेल्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुबीयांचे म्हणणे आहे, की हे लोक दारु प्यायले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. मंगळवारी रात्री 7 जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत हा आकडा 13 वर गेला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने दारु प्याल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे अद्याप मान्य केलेले नाही. या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या वर्षी एप्रिल राज्यात दारुबंदी लागू केली आहे.
कुटुंबीय म्हणाले साखर कारखान्या जवळील भट्टीवर प्याले दारू

-ही घटना गोपालगंज जवळील खजूरवाडी गावातील आहे. मृतांपैकी एक शशिकांत यांचा भाऊ महेशने सांगितले, की १५ ऑगस्ट रोजी त्याच्या भावासह गावातील काही लोक दारु पिण्यासाठी खजूरवाडी येथे गेले होते.
- ते हरखुआ साखर कारखान्याजवळील अवैध दारु अड्ड्यावर दारु प्यायले. त्यानंतर काही तासांनी त्यांची प्रकृती बिघडली.
- गोपालगंजचे जिल्हाधिकारी राहुल कुमार म्हणाले, 'मृत व्यक्तींचे पोस्टमॉर्टम केले जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतरच या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.'

पोटदुखी - उलटीने त्रस्त होते, काहींचे डोळे गेले
- कुटुंबीयांचे म्हणणे आहे की मृत लोकांना पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांना सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
- मृतांमध्ये परमानंद महतो, मंटू गिरी, उमेश चौहान, शशिकांत, दिनेश महतो, मनोज साह आणि रामजी शर्मा यांचा समावेश आहे. त्यांच्या शिवाय सोबराती मियां आणि दुर्गेश साह यांच्यासह काही लोक आजारी आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तीन जणांच्या समितीत कोण-कोण
बातम्या आणखी आहेत...