आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले, संतप्त जमावाने संचालकाचा डोळा काढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार) - नालंदा येथील एका निवासी विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळल्यानंतर संतप्त जमावाने रविवारी शाळेचे संचालक देवेंद्र प्रसाद सिन्हा यांना एवढी मारहाण केली की त्यात त्यांचा मृत्यू झाला.
नालंदा जिल्ह्यातील जगदीशपूर गावात डीपीएस (देवेंद्र प्रसाद सिन्हा) नावाने निवासी विद्यालय आहे. येथील चार मुले शनिवार पासून बेपत्ता होती, त्यातील दोघांचे रविवारी मृतदेह सापडले. त्यानंतर गावकरी संतप्त झाले, त्यांनी शाळेच्या इमारतीवर दगडफेक आणि मोडतोड केली. शाळेची दोन वाहने पेटवून देण्यात आली. त्याचवेळी संतप्त जमावाची नजर देवेंद्र सिन्हा यांच्यावर पडली आणि जमावाने त्यांना निर्दयपणे मारहाण सुरु केली. मारहाणीनंतर त्यांचा एक डोळा काढून घेण्यात आला. सिन्हा यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना रस्त्यातच त्यांचे निधन झाले. जमाव संतप्त होऊन शाळा आणि सिन्हा यांच्यावर तुटून पडला असताना पोलिस मुक दर्शक झाले होते.
जगदीशपूर येथे आसपासच्या चार पोलिस स्टेशनचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर जमावावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मृत विद्यार्थ्यांमध्ये लहुआर गावातील श्यामकिशोर प्रसाद यांचा 10 वर्षांचा मुलगा सागर कुमार आणि पचवारा येथील मोहन प्रसाद यांचा 11 वर्षांचा मुलगा रवीकुमार यांचा समावेश आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे, शाळेत विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होत होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्र
बातम्या आणखी आहेत...