आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींवर हल्ला; सहा जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाजीपूर/पाटणा - बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री वैशाली जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाच्या सहा संशयित कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

वैशालीनगरचे पोलिस अधीक्षक राकेशकुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी ९ जणांवर एफआयआर दाखल झाला असून त्यात या सहा जणांचा समावेश आहे. राजा पाकर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकाच्या जबाबावरून आणखी १०० अज्ञात व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा तपास सुरू आहे.  

भाजपचे माजी आमदार अच्युतानंदसिंग यांच्या आईच्या श्राद्ध समारंभासाठी जात असताना सुशीलकुमार मोदी यांच्या ताफ्यावर काळा पहाड गावाजवळ मंगळवारी रात्री हल्ला झाला होता. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचा ताफा तेथून गेल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. हा भाग राजदचा बालेकिल्ला आहे.
बातम्या आणखी आहेत...