आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-शहांमुळेच गुन्हा दाखल, 2004 मध्ये तर मिशीही नव्हीत घोटाळा कसा करणार? - तेजस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा  - बेनामी संपत्ती प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) छापे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी आपली भूमिका मांडली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय सूड घेण्याच्या भावनेतून ही कारवाई करण्यात आली आहे.
 
 मी जेव्हा लहान होतो तेव्हाचे हे प्रकरण आहे. २००४ मध्ये तर मला मिशीही आली नव्हती. १२-१३ वर्षांचा मुलगा घोटाळा कसा करू शकेल? मला बिहारच्या जनतेने निवडले आहे. या आरोपांबाबत मी जनतेच्या न्यायालयात जाईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत, असे राजदने बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी सांगितले. दुसरीकडे, ज्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे त्यांनी जनतेला उत्तर द्यावे, असे  संयुक्त जनता दलाने म्हटले होते.  
 
तेजस्वी यादव म्हणाले की, मी गरीब, मागास, अल्पसंख्याक आणि समाजातील कमकुवत वर्गांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे माझ्याविरोधात कट रचणे सुरू झाले. आम्ही केंद्र सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला. गेल्या दोन वर्षांच्या माझ्या कार्यकाळावर कोणीही बोट दाखवू शकत नाही, असा दावाही तेजस्वी यांनी केला.  
 
तेजस्वी यांच्यावर कोणकोणते गुन्हे?
बेनामी संपत्ती :
१६ मे रोजी लालू आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या २२ ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्यानंतर विभागाने दिल्ली, पाटणा आणि दानापूरपर्यंत कारवाई केली. मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, त्यांच्या रागिणी आणि चंदा यादव या दोन मुली यांच्याशी संबंधित १२ मालमत्ता आणि जमिनी तात्पुरत्या जप्त केल्या होत्या. १००० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जमा केल्याच्या आरोपाच्या घेऱ्यात लालूंचे चिरंजीव तेजप्रताप यादव आणि इतर नातेवाइकही आहेत.
 
रेल्वे निविदा घोटाळा 
७ जुलैला सकाळी सीबीआयने लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १२ ठिकाणांवर छापे टाकले. सीबीआयने सांगितले की, लालू, राबडीदेवी आणि तेजस्वी यांच्यासह ७ लोकांच्या विरोधात आणि एका कंपनीच्या विरोधात फसवणूक-गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास संस्थेनुसार, २००६ मध्ये जेव्हा लालू रेल्वेमंत्री होते तेव्हा रांची आणि पुरीतील हॉटेलच्या निविदा जारी करताना घोटाळा करण्यात आला.
 
राजीनाम्याचा प्रश्न विचारताच  पत्रकारांना धक्काबुक्की, मारहाण
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना मारहाण केली. तेजस्वी बाहेर निघत होते तेव्हा पत्रकारांनी त्यांना राजीनाम्याशी संबंधित प्रश्न विचारले. त्यामुळे त्यांचे सुरक्षा रक्षक आणि समर्थक भडकले आणि त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की सुरू केली. मारहाणीआधी तेजस्वी यादव यांनी माध्यमांवर राग व्यक्त केला होता. माध्यमांतील एक
गट मोदी समर्थक आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...संबंधित घटनेचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...