आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये मान्सून, वीज पडून 57 ठार, औरंगाबादमध्ये पिता-पूत्राचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नौबतपूर येथे या ठिकाणी वीज पडली. या ठिकाणी जमीनीला भेगा पडल्या आहेत. - Divya Marathi
नौबतपूर येथे या ठिकाणी वीज पडली. या ठिकाणी जमीनीला भेगा पडल्या आहेत.
पाटणा - बिहारमध्ये पाऊसाला जोरदार सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये वीज अंगावर पडल्याने 57 जण ठार झाले. 24 जखमी आहेत. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपातकालिन बैठक बोलावली आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

कुठे झाला पाऊस, कुठे पडली वीज
- बिहारच्या अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे.
- गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
- पाटण्याच्या बिहटा येथे पाच, नौबतपूरमध्ये दोन, रोहतासच्या नासरीगंड भागात चार लोक मृत्यूमुखी पडले.
- तर, औरंगाबादमध्ये पिता-पुत्र वीज अंगावर पडल्याने ठार झाले.
- कैमुरमध्ये चार आणि नालंदामध्ये चारजणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली आपातकालिन बैठक
- वीज पडल्याने 57 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने घटनेचे गांभीर्य ओळखत बैठक बोलावली आहे.
- मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वतः आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली.
- मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, वीज अंगावर पडल्याने बालके जखमी

(Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...