आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Election 2014 50 JD U Legislator Angry With Nitish Contact Us At: Sushil Modi

सुशील मोदींचा दावा; जदयूचे 50 आमदार संपर्कामध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - सत्ताधारी जदयूचे 50 हून अधिक आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा बिहार भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. त्यानंतर बिहार सरकारचे राजकीय भवितव्य अधांतरी झाले आहे. हा खटाटोप लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चाललेला आहे, अशी प्रतिक्रिया राजद आणि काँग्रेसने दिली आहे. जदयूच्या 116 पैकी 50 हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. आघाडी तोडण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयावर हे आमदार असंतुष्ट आहेत.
मोदींच्या गोष्टी मोदीच जाणोत
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव म्हणाले, सध्या देश वाचवण्याची लढाई होत आहे. तुम्ही राज्याची गोष्ट करता. सुशील मोदी जे म्हणत आहेत ते त्यांनाच ठाऊक. सध्या कराचीबद्दल बोलले जात आहे, तुम्ही रांचीबद्दल विचारताय.
काँग्रेसचे बिहार प्रभारी सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले, सध्या पक्ष लोकसभा निवडणुकीत व्यग्र आहे. निवडणुकीनंतर पुढील रणनीती ठरवण्याचा विचार केला जाईल.
जदयू नेते आणि बिहारचे मंत्री श्याम रजक म्हणाले, आरएसएसच्या नेत्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. ते कितीही खोटे बोलू शकतात. ते नेहमीच म्हणत होते. परंतु बिहार सरकारला काहीही धोका नाही.