आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Ex Mla Bahubali Munna Shukla Killed Ex Minister And Ias Officer

या दबंगसाठी तुरुंगात नाचत होत्या डान्सर्स, मंत्री-जिल्हाधिकाऱ्याची केली हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय राहिली आहे येथील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक. मग ते राजदचे दबंग खासदार शहाबुद्दीन असतील, लोक जनशक्ती पक्षाचे सूरजभान नाही तर जेडीयूचे सुनील पांडे. यांची पहिली ओळख म्हणजे गुंड, नंतर राजकारणात येऊन यांनी तिथेही धाक दाखवण्याचे काम केले. असाच एक दबंग नेता म्हणजे माजी आमदार मुन्ना शुक्ला उर्फ विजयकुमार शुक्ला.
आपल्या गुन्हेगारी कृत्यांना राजकीय दबावाखाली झाकण्यासाठी मुन्ना शुक्ला राजकारणाला शरण आला आणि दबंग आमदार झाला. त्याच्यावर गोपालगंजच्या जिल्ह्याधिकाऱ्याच्या हत्येसह अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्याशिवाय बिहारचे माजी मंत्री बृजबिहारी प्रसाद यांच्या हत्ये प्रकरणी कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली होती. मात्र तुरुंगात असतानाही तो चर्चेत राहिला आहे. कधी तुरुंगात डान्सर्स बोलावून त्यांचा कार्यक्रम केला म्हणून तर कधी तुरुंगात राहून पी.एचडी पूर्ण केली म्हणून.

मोठा भाऊ होता क्रिमीनल
मुन्ना शुक्लाची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्यामुळेच तो लवकरच कुख्यात झाला. उत्तर बिहारच्या अंडरवर्ल्ड डॉनची पदवी त्याला वारसाहक्काने मिळाली. त्याचा मोठा भाऊ छोटन शुक्ला हा गुन्हेगारी जगताचा बेताज बादशाह मानल्या जात होता. छोटनने विद्यापीठात शिकत असताना गुन्हेगारी कारवाया सुरु केल्या होत्या. नंतर तो ठेकेदारी करु लागला. उत्तर बिहारमधील प्रत्येक मोठ्या कामावर त्याने डल्ला मारला. त्याचवेळी त्याने अंडरवर्ल्डमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. या गुन्हेगारीनेच 1994 मध्ये त्याचा जीव घेतला. त्याची हत्या झाली. त्याच्या हत्येमागे कुख्यात दीपकसिंहचा हात असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कसा झाला गुन्हेगाराचा नेता