आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Flood Alert: Over One Lakh To Be Evacuated

कोसीचा पूर नियंत्रणात;70000 नागरिक, 2250 पशुधन सुरक्षित स्थळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोसी नदीचा पूर ओसरला असून जलपातळी स्थिर असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यामुळे सध्या तरी पुराचा धोका टळला आहे. नेपाळमध्ये भूस्खलनामुळे नदीच्या मार्गात अडथळे आल्याने बिहारमध्ये पूर येण्याच्या संशयावर सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, कोसीच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला. समितीने बिहारचे मुख्य सचिव तसेच इतर अधिकार्‍यांशीही सल्ला-मसलत केली. दरम्यान, बिहार राज्य सरकारने 70 हजार नागरिक व 2,250 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. स्थलांतरितांना 128 छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. लष्कराचे 500 जवान आणि आपत्ती निवारण दलाची 19 पथके मदतीसाठी तैनात आहेत.

नेपाळमध्ये भूस्खलनात मृतांचा आकडा 29 वर
नेपाळमध्ये रविवारी झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 29 वर पोहोचली असून सोमवारी ढिगार्‍याखालून आणखी 19 मृतदेह काढण्यात आले. अजूनही 134 लोक बेपत्ता आहेत. या घटनेत 50 घरे गाडली गेली असून 27 घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर 30 घरांची पडझड झाली आहे.