आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bihar Floods Kill More Than 72, SDRF & NDRF Moves 3 Lakh Flood Victims To Safer Place

संततधार पाऊस, नेपाळच्या पाण्याने बिहारमध्ये 72 बळी; अनेक गावे पाण्याखाली, 73 लाख लोक प्रभावित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपले सर्वकाही सोडून लोक मुलाबाळांसह सुरक्षित स्थळाच्या शोधात निघाले आहेत. - Divya Marathi
पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपले सर्वकाही सोडून लोक मुलाबाळांसह सुरक्षित स्थळाच्या शोधात निघाले आहेत.
पाटणा/मुझफ्फरपूर/भागलपूर - संततधार पावसाने आणि नेपाळमधून येणाऱ्या पाण्याने बिहारमधील 17 जिल्ह्यात पूरस्थिती आहे. 73 लाख लोक यामुळे प्रभावित झाले आहेत. गेल्या 24 तासात आणखी 16 दगावले असून मृतांची संख्या आता 72 वर पोहोचली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी जवळपास 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. एअरफोर्सचे दोन हेलिकॉप्टरने पूरग्रस्त भागात अन्नाचे पाकिट पोहोचवले जात आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफची अतिरिक्त एक-एक तुकडी खगडिया, गोपालगंज, पश्चिमी चंपारण्य आणि पूर्व चंपारण्य, सारण येथे रवाना करण्यात आली आहे. तर, एसडीआरएफची एक टीम बचाव कार्यासाठी सहरसा येथे रवाना करण्यात आली आहे.

17 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका
1) खगड़िया, 2) गोपालगंज, 3) पश्चिम चंपारण, 4) पूर्व चंपारण, 5) सारण, 6) किशनगंज, 7) कटिहार , 8) अररिया, 9) मुजफ्फरपुर, 10) दरभंगा, 11) सीतामढ़ी, 12) पूर्णिया, 13) भागलपुर, 14) मोतिहारी, 15) मधुबनी, 16) सहरसा आणि 17) शिवहर. 
 
साधारण हे 28 जिल्हे असतात पूरग्रस्त
- अररिया, बेगूसराय, भागलपुर, भोजपुर, बक्सर, दरभंगा, पूर्व आणि पश्चिम चंपारण, गोपालगंज, कटिहार, खगड़िया, किशनगंज, लखीसराय, मधेपुरा, मधुबनी, मुजफ्फरपुर, नालंदा, पटना, पूर्णिया, सहरसा, समस्तीपुर, सारण, शेखपुरा, शिवहर, सीतामढ़ी, सीवान, सुपौल, वैशाली या जिल्ह्यांना दरवर्षी पूराचा फटका बसतो.

नेपाळच्या नद्यांनी भारतातील नद्यांना पूर 
बिहारमध्ये सीतामढी येथे पुराचे पाणी शहरातून वाहू लागले आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या पावसाचा परिणाम येथील नद्यांवर होतो आहे. गंडक, बुढी गंडक, मसान, पंडई, दोहरम, गांगुली, सिकटा, ओरिया, द्वारदह, हडबोडा, बलोर, हरपतबेनी अादी नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. तीन दिवसांत सीतामढी आणि बेतिया येथे ५२ जणांचा मृत्यू झाला. पश्चिम चंपारण जिल्ह्यात शनिवारी पुराने कहर केला आहे.
 
उत्तर प्रदेशात 18 जण पाण्यात बुडाले
उत्तर प्रदेशात गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला. या पुराचा फटका सुमारे 8 लाखांहून अधिक कुटुंबांना बसला आहे. परिस्थिती बिघडत चाललेली पाहून महाराष्ट्रातील पुणे येथून एनडीआरएफचे 4 पथक मागवण्यात आले. लष्करासही पाचारण करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी दौरा केला. तेथे मदतकार्य सुरू आहे. प्रधान सचिव अरविंदकुमार यांनी सांगितले, पूरग्रस्त भागासाठी एनडीआरएफची चार पथके एअरलिफ्टने मागवण्यात आली.

देशात सामान्यपेक्षा 3 टक्के कमी पाऊस, द. भारतात 17 टक्के कमी
देशात सामान्यापेक्षा तीन टक्के कमी पाऊस पडला आहे. दक्षिणते 17 अक्के तर मध्य भारतात 7 टक्के कमी पाऊस पडला. तथापि, सुमारे 10 राज्यांमध्ये पूरपरिस्थिती आहे. पूर्वोत्तर भारत, बिहार, आणि उत्तर प्रदेश सर्वाधिक प्रभावित आहेत.
 
आसाम: 30 वर्षांचा विक्रम मोडीत, 70 टक्के भागांत पाणी
ब्रम्हपुत्र नदी दुसऱ्यांदा दुथडी वाहतेय. यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या 70 टक्के भागांत पाणी आहे. यंदा पावसाने 30 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.
 
उत्तराखंड: कैलास मानसरोवर मार्गावर ढगफुटी, चार ठार
पिथौरगड जिल्ह्यात कैलास मानसरोवर मार्गावर सोमवारी पहाटे ढगफुटीमुळे 3 जवानांसह चौघे ठार झाले असून 6 जण बेपत्ता आहेत.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पूरग्रस्त बिहारमध्ये अनेक गावांचे झाले तळे...
बातम्या आणखी आहेत...