पाटणा - बिहारमध्ये दारुची विक्री आणि मद्यप्राशनावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय नितीशकुमार सरकारने मंगळवारी जाहीर केला. त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू झाली. दरम्यान, या निर्णयामुळे काही अट्टल मद्यपी वेड्यासारखे वागत आहेत. काही चक्कर येऊन पडत आहेत तर काही घरातील साबण खात आहेत. वेड्यासारख्या मद्यपींना येथील पुर्नवसन केंद्रात दाखल केले जात आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यात दारूबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार बार आणि रेस्तराँमध्ये दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने या वर्षी १ एप्रिलपासून ग्रामीण भागात देशी दारूची विक्री आणि सेवनावर बंदी घातली होती. शहरांमध्ये मात्र विदेशी दारूच्या विक्रीस परवानगी देण्यात आली होती.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना नितीशकुमार म्हणाले की, पाटणा आणि इतर शहरांत अवघ्या चार दिवसांत दारूच्या विरोधात महिला आणि मुलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राज्यात दारूच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात पूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे महिला वर्ग समाधानी आहे.
ऋषि कपूरने काय ट्विट केले
- ऋषि कपूरने ट्विट करुन म्हटले, 'वाह नितीशकुमार, दारु बाळगणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा आणि शस्त्र ठेवणाऱ्याला पाच वर्षांची शिक्षा.'
- अशा प्रकारे बिहारला फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होईल.
- 'जागो, तुमचे 3000 कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.'
पुढील स्लाइडवर पाहा, ऋषि कपूरचे ट्विट.... नितीश कुमार यांनी का घेतला हा निर्णय....