आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar In Middle Age Mobile Ban To Unmarried Women

बिहारमध्ये अविवाहित मुलींना मोबाइल वापरास बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - अविवाहित मुलींनी मोबाइल फोनचा वापर करण्यावर बंदी घालणारा आदेश बिहारमधील सोमगड ग्रामपंचायतीने काढला आहे. एखाद्या मुलीने या फतव्याचे उल्लंघन केल्यास तिच्या कुटुंबीयांना जबर दंड आकारला जाईल, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे. पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील सोमगड पंचायतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये हा वादग्रस्त निर्णय घेण्यात आला.
सोमगड ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलेकडे असले तरी सरपंचाचे पती झाकीर अन्सारी यांच्या हातीच कारभाराची सर्व सूत्रे आहेत. शेकडो गावकर्‍यांनी मान्यता दिल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी सर्व कुटुंबांनी घ्यावी, असे अन्सारी यांनी म्हटले आहे.