आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधूर सासऱ्याबरोबर विधवेचे संबंध, लग्नाची परवानगी मागितली तर महिलेला जिवंत जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये जात पंचायती अजूनही किती निष्ठूर आणि मध्ययुगीन विचारांच्या आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. सुपौल जिल्ह्यातील एका पंचायतीच्या आदेशाने 35 वर्षीय विधवा महिलेला गावासमोर जिवंत जाळण्यात आले. महिलेवर चुलत विधूर सासऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप होता. त्या दोघांना लग्न करायचे होते. त्यामुळे नाराज झालेल्या पंचायतीने एका कागदावर महिलेची स्वाक्षरी घेऊन शंभराहून अधिक लोकांसमोर तिला जिवंत जाळण्यात आले. त्या कागदावर लिहिले होते, की महिलेसोबत होणाऱ्या कोणत्याही घटनेसाठी गावातील कोणीही व्यक्ती जबाबदार राहाणार नाही.
काय आहे प्रकरण
सुपौल जिल्ह्यातील पिपरा पोलिस स्टेशन अंतर्गत लालपूर गावात बुधवारी ही घटना घडली आहे. पीडित महिलेचे नाव अनीता असल्याचे सांगितले जाते. अनीता विधवा होती आणि तिला तीन मुले आहेत. गावातील एका महिलेने सांगितले, की अनीताच्या सासूने शनिवारी तिला तिचा चुलत सासरा घनशी शर्मासोबत आक्षेपार्ह्य स्थितीत पाहिले. घनशीची पत्नी तीन वर्षांपूर्वी वारली असून त्यालाही तीन मुले आहे. दोघांच्या संबंधाची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि पंचायत बोलावण्यात आली. दोघेही लग्न करण्यास तयार होते, पण पंचायतीला त्यांचा निर्णय मान्य नव्हता. बुधवारी पुन्हा एकदा पंचायत बसली आणि महिलेला जिवंत जाळण्यात आले.
पोलिस काय म्हणतात
सुपौलचे पोलिस अधिक्षक पंकर राज म्हणाले, की त्यांना अद्याप घटनेची माहिती नाही. तर पिपरा पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार चंदन कुमार यांनी सांगितले, की हत्येची तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नाही. त्यामुळे आत्महत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, महिलेचा अंगठा घेतलेले पत्र
बातम्या आणखी आहेत...