आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Mahagathbandhan: Grand Alliance Finalises Seat Distribution

बिहार रणधुमाळी : महायुतीचे उमदेवार तर भाजपचे स्‍टार प्रचारक निश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेमध्‍ये माहिती देताना नितीशकुमार - Divya Marathi
पत्रकार परिषदेमध्‍ये माहिती देताना नितीशकुमार
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. यामध्‍ये भाजपला पराभूत करण्‍यासाठी महायुतीने (आरजेडी, जेडीयू आणि कॉंग्रेस) दंड थोपटले असून, त्‍यांनी आज (बुधवार) आपल्‍या 242 उमेदवारांची नावे घोषित केलीत. यामध्‍ये लालूप्रसाद यादव यांच्‍या दोन मुलांचा समावेश आहे. तेजस्वी यांना राघोपूर तर तेजप्रताप यांना महुआ मतदार संघातून मैदानात उतरवले जाणार आहेत. दरम्‍यान, भाजपनेही आज आपल्‍या स्‍टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्‍ये नाराज शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव आहे.
नितीशकुमार यांनी डागली बीजेपी आणि आरएसएसवर तोफ
या संदर्भात मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन बीजेपी आणि आरएसएसवर तोफ डागली. नितीश म्‍हणाले, ''बीजेपी विकासाच्‍या गप्‍पा मारत आहे. पण, धर्म, जातीच्‍या नावावर विभाजन करत आहे. याचाच पुरावा मोहन भागवत यांच्‍या आरक्षणाबाबत वक्‍तव्‍यातून मिळाला आहे. तो एक घालक विचार आहे. ज्‍याला कधीच स्‍वीकार केले जाऊ शकत नाही,'' असे ते म्‍हणाले.
'बीजेपीची औकात काय आहे?'
नितीश म्‍हणाले, '' आरएसएसचे राजकीय संघटन म्‍हणजे बीजेपी आहे. त्‍या शिवाय काहीच नाही. आरएससच्‍या पुढे बीजेपीची औकात काय आहे ? संघाचे लोक आरक्षणाला समाप्‍त करू पाहातात. मात्र, बीजेपी सांगत आहे की, संघाच्‍या विचाराशी त्‍यांना काही देणे घेणे नाही. हे कसे शक्‍य आहे, असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.
सर्वच घटकातील व्‍यक्‍तींना प्रतिनिधित्‍व
नितीश कुमार म्‍हणाले, आम्‍ही उमेदवरांची निवड करताना सर्वच घटकांना न्‍याय देण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न केला. जनरल कॅटेगरीचे 16 टक्‍के, मागासवर्गीचे 55 टक्‍के, एससी-एसटीचे 16 टक्‍के आणि 14 टक्‍के मुस्लिम व्‍यक्‍तींना उमेदवारी दिली.

पुढील स्‍लाइडवर वाचा नाराज शुत्रुघ्‍न सिन्‍हा बीजेपीचे स्‍टार प्रचारक.....