आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅट्रिक, इंटर परीक्षांच्या उत्तरपत्रिका हाताने नव्हे, टॅब्लेटने तपासणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहार विद्यालय परीक्षा समितीने मूल्यांकन प्रक्रियेतील बदलाची योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत ऑन स्क्रीन मॉड्यूलवर भर दिला जात आहे. यामध्ये उत्तर पत्रिकांचे बारकोडिंग केले जाईल. उत्तरपत्रिकेचे प्रत्येक पान स्कॅन केले जाईल आणि त्या तपासणी केंद्रात संचालकांच्या लॉगिनमध्ये टाकल्या जातील. मूल्यांकन केंद्रांवर सर्व शिक्षकांना टॅब्लेट दिले जाईल. या टॅब्लेटवर केंद्र संचालक उत्तरपत्रिका हस्तांतरित करतील आणि ऑनस्क्रीन डिजिटल पेनच्या माध्यमातून गुण देतील.

मंडळ प्रशासनाने सरकारला उत्तर पत्रिकांची ऑनलाइन स्कॅनिंग संगणकाद्वारे तपासणीचाही पर्याय दिला आहे. सीबीएसईने सन २०१३- १४ मध्ये या प्रणालीचा वापर केला होता. या प्रणालीत प्रती उत्तरपत्रिका ६० रुपयांप्रमाणे एकूण ५४ कोटी रुपये तपासणीसाठी लागतील. यामध्ये अंतिम निर्णय सरकारला घ्यावयाचा आहे.

प्रश्नत पासायचा राहिल्यास, त्रुटी दाखवेल :एखाद्या परीक्षकाकडून प्रश्न तपासायचा राहून गेल्यास त्यांना एरर मेसेज दिसून येईल. यामुळे एखादा प्रश्न तपासायचा राहून तर गेला नाही ना हे त्यांना समजेल. यासोबत प्रश्नांसाठी दिलेल्या गुणापेक्षा अतिरिक्त गुणही देता येणार नाहीत. डिजिटल पेनाने प्रत्येक उत्तराला गुण दिल्यानंतर प्रश्नसंख्येनुसार विद्यार्थ्यांच्या डाटाबेसमध्ये अपडेट होतील. या गुणांची बेरीज करून संबंधित पेपरला मिळालेले गुण मुख्य डाटाबेसमध्ये टॅब्लेट पाठवेल. यामुळे विद्यार्थ्यांची गुणपत्रिका त्वरित तयार करण्यास मदत मिळेल. शिवाय निकालही वेळेवर लागेल.

३५ कोटींचा अतिरिक्त खर्च येईल, एका उत्तरपत्रिकेला १२ ऐवजी ४० रु. लागतील :नवी व्यवस्था लागू झाल्यावर दहावी इंटर परीक्षेच्या जवळपास २६ ते २८ लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका नव्या पद्धतीने तसासल्या जातील. टॅब्लेटवर तपासणीच्या व्यवस्थेत जवळपास ३५ कोटी रु. खर्च येईल. प्रति उत्तरपत्रिका मूल्यांकनाचा दर सरासरी ४० रुपये येईल. सध्या एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी १२ रुपये दिले जातात.

परिणाम काय? : थांबणार का फसवणूक बोर्डाने मूल्यांकनाच्या कार्यातील गडबड घोटाळा थांबविण्यासाठी ही योजना बनवली गेली होती. परीक्षेनंतर लगेचच नक्कलांना (कॉप्या) डिजिटल स्वरूपात बदलले जाईल. यामुळे मग कुणी ठरवूनही बदल करू शकणार नाही. एकदा कॉपीवर बारकोड लागल्यानंतर विद्यार्थी वा तपासणारा-कुणीही यात काहीही करू शकणार नाही.

निर्णय का? : टॉपर घोटाळ्याचा धडा
टॉपर घोटाळ्याने केवळ बिहार विद्यालय परीक्षा समितीची नव्हे तर संपूर्ण राज्याची प्रतिमा मलिन झाली. यामुळे सरकार मंडळाच्या स्तरावर अनेक पावले उचलण्यात आली. हा प्रस्तावही त्याचाच भाग आहे. नव्या प्रणालीतून मूल्यांकन घोटाळ्याची शक्यता कमी होईल.
बातम्या आणखी आहेत...