आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोदींच्या फोटोला बुटाने मारा’, असे वक्‍तव्‍य करणाऱ्या बिहारच्या मंत्र्याची अखेर माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - नोटाबंदीनंतरच्या आंदोलनात लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर बुटाने मारावे, असे वादग्रस्त विधान करणारे बिहारचे उत्पादन शुल्क तथा मद्यप्रतिबंधक खात्याचे मंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी बुधवारी माफी मागितली. परंतु आक्रमक भाजप सदस्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. विधानपरिषदेत आमदारांनी वेलमध्ये घुसून कागदपत्रे फाडली. त्यामुळे उपसभापतींनी  कामकाज  दिवसभरासाठी तहकूब केले. 

भाजपच्या आमदारांनी बुधवारी बिहार विधानसभेत अब्दुल जलील मस्तान यांच्या राजीनाम्याची मागणी करून सभागृह दणाणून सोडले होते. सभागृहातील तापलेले वातावरण पाहून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, टीव्ही वाहिनीवरील फुटेज पाहिल्यानंतर मलाही वाईट वाटले. माझ्या सहकाऱ्याची ही वागणूक अत्यंत खेदजनक आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतरही भाजप सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी मस्तान यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरुच ठेवली.

त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले होते. मस्तान हे पूर्णिया मतदारसंघाचे काँग्रेसकडून प्रतिनिधित्व करतात. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतरही भाजपचे नेते प्रेम कुमार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मस्तान यांचा राजीनामा घेण्यात यावा, भाजप आमदार मागणीवर ठाम होते.त्यांच्या घोषणा सुुरुच होत्या. दरम्यान, माझ्या बोलण्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या असल्यास मी त्यांची माफी मागतो, असे मस्तान यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते माफीसाठी उभे राहिले. तेव्हा संतापलेल्या सदस्यांनी वेलमध्ये प्रवेश करून खुर्च्या-टेबल उचलून  टाकले.  
 
स्थानिक टीव्ही वाहिनीचे फुटेज : मस्तान यांनी २२ फेब्रुवारी रोजी नोटबंदीविरोधी निदर्शनात सहभाग घेतला होता. तेव्हा निदर्शकांना उद्देशून त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहत फोटोला बुटाने मारा, यासारखे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. ५० दिवसांत नोटाबंदीनंतरची परिस्थिती सुधारेल, या आश्वासनाची खिल्लीही त्यांनी उडवली. त्याबद्दल मोदी शिक्षेला पात्र आहेत,  असे मस्तान म्हणताना तेे पाहायला मिळतात. 

मंत्रिमंडळातून हाकला
मंत्रिपदावरील व्यक्तीने अशा प्रकारच्या निदर्शनात सहभागी होणे, जमावाला पंतप्रधानांबद्दल अनुदार उद्गाराद्वारे भडकावणे योग्य नाही. म्हणूनच नितीशकुमार यांच्यात जराही नैतिकता शिल्लक असल्यास त्यांनी मस्तान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुशील मोदी यांनी केली आहे.

असंवैधानिक विधानाला काँग्रेसचा विरोध : मस्तान हे काँग्रेसचे आमदार आहेत. परंतु मोदी यांच्या विरोधात केेलेल्या वक्तव्यामुळे राजकीय गोंधळ वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसने मस्तान यांची साथ सोडली. पक्ष कोणत्याही असंवैधानिक विधानाच्या विरोधात आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...