आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: बिहारमध्ये अर्थमंत्र्यांच्या नातवाचे दिवसाढवळ्या अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमध्ये पुन्हा एकदा अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले आहे. यावेळी राज्याचे अर्थमंत्री यांच्या कुटूंबियांना टार्गेट करण्‍यात आले आहे. बिहाराचे अर्थमंत्री विजेंद्र यादव यांच्या नातवाचे अपहरण झाले आले आहे. ही घटना गेल्या एक जुलैची आहे. परंतु, पोलिसांनी हे प्रकरण दडपून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री यादव यांची वरिष्ठ कन्या गीता देवी यांचा मुलगा मनीष याचे अपहरण झाले आहे. मनिष इयत्ता सातवीत शिकतो. मनिष आणि त्याचा भाऊ आपल्या सायकलीने घरून (बेलोखराहून) एनएम पब्लिक स्कूल, परसा येथे जात होते. परंतु वाटेत पाऊस लागल्याने त्याने आपल्या भावाला घरी पाठवून दिले. तो पाऊस थांबेपर्यंत वाटेल एका ठिकाणी थांबला होता. या दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने मनीषला जबरदस्तीने उचलून नेले. शेजारी असलेल्या शेतात काम करणार्‍या महिलेने त्याला विरोध केला. परंतु, मनिष त्याचा भाचा असल्याचे सांगून तो तेथून पसार झाला.

यादव परिवाराने मनिषचा खूप शोध घेतला. परंतु, त्याचा पत्ता लागला नाही. नंतर अखेर किशनपूर पोलिस ठाण्यात 4 जुलैला तक्रार दाखल करण्यात आली. दुसरीकडे, अर्थमंत्री विजेंद्र यादव यांनी सांगितले, की आतापर्यंत कोणचाही खंडणीसाठी फोन आलेला नाही. बेपत्ता मनिषचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.