आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार अनंत सिंह समर्थकांचा रेल्वे पेटवण्याचा प्रयत्न, पोलिसांवर दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - जनता दल (संयुक्त)चे आमदार अनंत सिंह यांच्या अटकेविरोधात पुकारलेल्या बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. सिंह यांच्या समर्थकांनी दिल्ली - हावडा रेल्वे मार्गावरील एक रेल्वे जाळण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनूसार, गुरुवारी दुपारी अनंत सिंह यांच्या समर्थकांनी आरा-मोकामा पॅसेंजर रेल्वेच्या डब्यांवर पेट्रोल टाकले आणि आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढले आणि रेल्वे धुवून काढण्यात आली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करुन त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला होता. एका युवकाचे अपहरण आणि हत्येच्या आरोपात आमदार अनंत सिंह यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. त्याविरोधात त्यांच्या समर्थकांनी आज (गुरुवार) बंद पुकारला होता.

पोलिस-आंदोलकांमध्ये धुमश्चक्री
आंदोलक आणि पोलिसांमध्ये गुरुवारी चांगली धुमश्चक्री उडाली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली होती. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आंदोलकांच्या दिशेने दगड भिरकावले. पोलिसांच्या तुलनेत आंदोलक उग्र होत असल्याचे सुरुवातीला दिसले. मात्र अतिरिक्त बल मागवण्यात आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पिटाळून लावले. त्यानंतर बाढच्या एसबीआर चौकाला छावणीचे स्वरुप आले आहे. मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तिथे जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिस चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ देत नाही आहे.
खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात घोषणाबाजी
बिहारमधील मोकामा मतदारसंघातून विजयी झालेले अनंत सिंह यांच्या समर्थकांनी भूनेश्वर चौकात गोंधळ घालत खासदार पप्पू यादवांविरोधात घोषणाबाजी केली. पप्पू यादव 27 जून रोजी बाढ येथे येणार आहेत. पप्पू यादव यांना बाढमध्ये पाय ठेवू देणार नसल्याची घोषणा आंदोलकांनी केली आहे. त्यांच्या येण्यामुळे हिंसाचार भडकण्याची शक्यता आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

हावडा-दिल्ली मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत
आमदार सिंह यांच्या समर्थकांनी हावडा-दिल्ली मार्गावरील रेल्वे जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पुढील स्लाइडध्ये पाहा, अनंत सिंह समर्थकांनी बंद केली बाजारपेठ
बातम्या आणखी आहेत...