आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Continue Encounter Between Maoists And CRPF Jamui

बिहार : कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान नक्षल्यांशी चकमक, सीआरपीएफ अधिकारी शहीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमुई/पटना - जमुईच्या खैरा आणि चरकापत्थर परिसरातील लखारी गावात असणा-या जंगलामध्ये नवादाकडून कोम्बिंग ऑपरेशन करत पुढे येणा-या सीआरपीएफ जवानांची शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांची चकमक उडाली. यामध्ये सीआरपीएफच्या 7 व्या बटालीयनचे डेप्युटी असिस्टंट कमांडंट हीरा झा शहीद झाले. ही चकमक अजुनही सुरुच असल्याची माहिती मिळाली आहे. येथे शेकडोच्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहितीही मिळाली आहे. सध्या याठिकाणी सीआरपीएफचे अतिरिक्त जवान आणि पोलिस पाठवण्यात येत आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांकडून खैरा थाना परिसर आणि चरकापत्थर परिसरातील लखारी गावातील जंगलामध्ये सीआरपीएफची शोध मोहीम सुरू होती. या दरम्यान त्यांची नक्षलवाद्यांची चकमक उडाली. यात काही नक्षलवादीही जखमी झाल्याचे समजते आहे. मात्र तशी औरपचारिक माहिती मिळालेली नाही. जवानांनी नक्षलवाद्यांनी पूर्णपणे घेरले असल्याचे समजते आहे. जमुई-नवादा-गिरीडीह जिल्ह्याच्या सुरक्षारक्षकांकडून घेराव घालून आणि शोधमोहीमेचा वेग वाढवण्यात आला आहे.
फोटो: प्रतिकात्मक