आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News FIR Against Lalu Yadav And BJP Chief Shah

बिहार : लालू यादवांविरुद्ध जमुईत तर पाटण्यात अमित शहांविरोधात एफआयआर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: अमित शाहांसोबत केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह. - Divya Marathi
फाइल फोटो: अमित शाहांसोबत केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह.
रोसडा / समस्तीपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून चालू शकेल असे सरकार बिहारमध्ये द्या, असे आवाहन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी येथे आयोजित जाहीर सभांतून केले. राज्यात यंदा भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या वतीने बिहारच्या विकासासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेचे महत्त्व नितीशकुमार यांना नाही. उलट ते केंद्राकडून पैसे घेण्यास नकार देतात. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून ही भूमिका असेल तर बिहारचा विकास अशक्य आहे, असे शहा म्हणाले.
 
हेच तर आहे जंगल राज
माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले, बिहारमध्ये न्यायाधीशसुद्धा गुन्हेगारीची प्रकरणे निपटू पाहत नाहीत. कारण, न्यायाधीशांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकला जातो. हेच तर जंगल राज आहे. लालूंच्या मोठ्या मुलाकडे १७ लाख रुपयांची दुचाकी आहे. शिवाय तो बीएमडल्ब्यू कारमधून फिरतो. केवळ कपड्यानिशी पाटण्यात आलेल्या लालूंकडे एवढी संपत्ती आली तरी कुठून, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
पुढील स्लाइडमध्ये, लालू-शहांविरुद्ध गुन्हा