आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News In Marathi, Sushilkumar Modi, BJP, Lok Sabha Election

बिहारच्या मोदींना पक्षात वाढता विरोध, लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार दिल्याने अडचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - लोकजनशक्ती पार्टीशी युती, विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांची निवड आणि वाटेल त्या नेत्यांना पक्षात सामावून घेण्याच्या निर्णयामुळे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याविरुद्ध पक्षात असंतोष वाढत आहे. भरीस भर म्हणजे लोकसभा निवडणुकीत बाहेरच्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा मुद्दाही मोदींसाठी अडचणीचा ठरला आहे.


पक्षातील एकूणच ताळतंत्राबाबत अनेक नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे. मंगळवारी ‘चाय पर चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सुशीलकुमार यांच्याविरोधातील राग बाहेर निघाला. पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीविना मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याचे आक्षेप काही जणांनी नोंदवले. भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यापर्यंत हा मुद्दा गेला आहे. सिंह यांनी या प्रकरणाची माहितीही मागितली असल्याचे समजते. पक्षात आपला अवमान केला जात असल्याचाही काहींचा आक्षेप आहे. पक्षाच्या नाराज नेत्यांची सोमवारी रात्री एका माजी मंत्र्याच्या घरी बराच वेळ बैठक झाली. यादरम्यान त्यांनी राष्‍ट्रीय अध्यक्षांपर्यंत आपले म्हणणे कळवले. नाराज नेत्यांनी मंगळवारी ‘नमो चहा’नंतर बैठक घेऊन भविष्याची रणनीती ठरवल्याचे सांगण्यात येते.