आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News JDU Front Opened Against Nitish Kumar

बंडखोरांचा नितीशकुमारांवर प्रथमच थेट हल्ला, नवा पक्ष स्थापन करण्याची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर जनता दल (यूनायटेड) मध्ये नितीशकुमार यांच्या विरोधात भडकलेली आग त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतरही शमलेली नाही. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले जीतनराम मांझी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केल्यानंतर या विरोधाच्या ज्वाला आणखी भडकल्या असून त्यांनी नितीशकुमारांनाही घेरले आहे. शुक्रवारी जेडी(यू) मधील बंडखोरांच्या गटात आणखी चार आमदार सहभागी झाले आहेत. या आमदारांनी ज्ञानेंद्रसिंह ज्ञानू यांच्या नेतृत्वात थेट नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
ज्ञानू, पुनमदेवी, मदन सहनी, रविंद्र राय आणि राजू सिंह यांनी म्हटले आहे, की लोकसभा निवडणुकीत पक्षाची जी वाताहत झाली त्याला एकमेव नितीशकुमार यांचा 'अहंकार' जबाबदार आहे. त्यांनी कोणालाही न विचारता भाजपशी असलेली युती तोडली, यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना सोडले. पत्रकार परिषदेआधी पुनमदेवी यांच्या निवासस्थानी बंडखोर आमदारांची बैठक झाली. या आमदारांचा दावा आहे, की 50 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे शरद यादव यांच्या निर्देशांची वाट पाहात आहोत.
.
बंडखोर आमदारांनी स्पष्ट केले, की जर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला तर ते नवीन पक्ष देखील स्थापन करु शकतात. आगामी राज्यसभा निवडणुकीत जेडी (यू)ला याचा भूर्दंड भरावा लागू शकतो. नितीशकुमार यांनी जीतनराम मांझी साध्या सरळ दलित नेत्याला बळीचा बकरा बनवले आहे.