आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Laloo Yadav Arrived In Patna, Will Party Meeting Today

लालूंनी दिला नवा नारा, \'नितीश हटाव बिहार बचाव\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - लोकसभा निवडणुकीआधी बिहारचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रीय जनता दलातील (राजद) विरोधी आमदारांची बंडाळी थांबल्यानंतर लालू यादव नितीशकुमारांविरोधात आक्रमक झाले आहेत. 13 बंडखोर आमदारांपैकी 9 जणांना स्वगृही आणल्यानंतर भाजप आणि जेडीयू विरोधात त्यांनी मोर्चा उघडला आहे. लालू यादव यांनी राजकीय युद्धाला आता सरुवात झाली असल्याचे सांगत आता एकच नारा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आता फक्त 'मोदी हटाव भारत बचाव - नितीश हटाव बिहार बचाव' हा एकच नारा आहे. लालू यादवांनी रामविलास पासवान यांच्याविरोधात बोलणे टाळत नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्याआधी विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी लालू यादव गेले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष भेटले नाही त्यानंतर ते त्यांचा चिरपरिचीत अंदाजात माध्यमांसमोर आले आणि त्यांनी ही लढाईची सुरवात असल्याचे सांगत, जनतेत जाऊन नितीशकुमारांचे पितळ उघडे पाडणार असल्याची घोषणा केली. विधानसभा अध्यक्षांच्या निवासस्थानाहून लालू यादव राजभवनाकडे निघाले. सायकल रिक्शाची सवारी करत लालू यादव राजभवनाच्या दिशेने निघाले. त्यांच्या या यात्रेने पाटण्याच्या रस्त्यावर त्यांनी एक प्रकारे 'रोड शो'च केला आहे. राजभवनाकडे जात असताना त्यांनी नितीशकुमार यांच्यासह भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदावर नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, 'नितीश आणि मोदींना गरीबी काय कळणार आहे. मी चहा विकला आहे. रिक्शा चालविली आहे. त्यामुळे गरीबांचे दुःख मला कळते. हे दोघेही गरीबीचे सोंग घेऊन जनतेला फसवत आहे.' जनतेमध्ये मिसळून त्यांच्याच भाषेत बोलण्याची लालू यांदव यांची लकब देशाला परिचित आहे. मात्र, चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणापासून थोडो बाजूला गेले होते. राजदच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानतर लालू यादव यांना त्यांच्या शैलीत परतण्याची ऐती संधी मिळाली आहे.
बिहारमध्ये सोमवारी 13 आमदारांनी बंडखोरी केली होती त्यापैकी सहा आमदार सोमवारी रात्रीत पुन्हा स्वगृही परतले होते. त्यानंतर आज (मंगळवार) आणखी तीन आमदारांनी राजद मध्येच असल्याचे जाहीर केले आहे. या नऊ आमदारांसह लालू यादव विधानसभा अध्यक्षांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले, मात्र लालू यादव येण्याआधीच ते घराबाहेर निघून गेले. त्यानंतर माध्यमांसमोर आलेल्या लालू यादव यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये, मी पाटण्यात परतलो असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, नितीश सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे ते सरकार वाचवण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न करीत आहेत. त्यांनी बिहारमध्ये घोडेबाजार करुन राज्याचे देशात हसे केले आहे. राजद आमदार फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप लालू यादव यांनी केला. ते म्हणाले, नितीश सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. आता युद्धाला सुरवात झाली आहे. मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीत होतो. मात्र, आता पाटण्यात परतलो आहे. नितीशकुमार त्यांचे सरकार वाचवण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करीत आहेत. मी जनतेत जाऊन त्यांचे पितळ उघडे करणार आहे.
नितीशकुमार यांच्यावर पक्ष बळकावण्याचा गंभीर आरोप करतानाच, लालू यादव यांनी काँग्रेस सोबत आघाडीही होईल याचे सुतोवाच केले आहे. विशेष म्हणजे, राजदचे बंडखोर आमदार सम्राट चौधरी यांनी लालू काँग्रेससोबत आघाडी करीत असल्याच्या कारणावरूनच पक्ष सोडत असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, ज्यांनी लालू यादव यांना तुरुंगात डांबले. त्यासाठी नियामांमध्ये बदल केले. तरीही लालू यादव त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी उताविळ आहे. त्यापेक्षा त्यांनी राजद काँग्रेसमध्ये विलीन करावा.
पुढील स्लाइडमध्ये, बिहारमध्ये असे आहे बलाबल..