आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Muzaffarpur People Set Fire In Village 40 Houses After Student Murder

हल्लेखोरांनी प्रत्येक घरात घुसून लावली आग; संपूर्ण वस्‍ती जळून खाक, शेकडो लोक बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर/पाटणा- बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील अजिजपूर गावात झालेल्या हिंसक घटनेने पाच जणांचा बळी घेतला आहे. तिघांना जिवंत जाळण्यात आले असून दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अज‍िजपूरमधील एक वस्ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच वस्तीतील शेकडो लोक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.
अजितपूरमध्ये प्रेमसंबंधातून प्रियकराचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. रविवारी गावाशेजारील एका शेतात प्रियकराचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी गावातील 40 घरे पेटवून दिली होती. गावातील एका वस्ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. हल्लेखोरांनी प्रत्येक घरात घुसून ते पेटवून दिले आहे. या घटनेमुळे गावातील बहुतांश लोक आपली घरे सोडून पळून गेले आहेत. अद्याप ते परत आले नाहीत. संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे. घटनेची माहिती देण्याची कोणताच व्यक्त हिंमत करत नसल्याने चौकशीत अनेक अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अजितपूरमध्ये चार जिल्ह्यातील पोलिस आणि लष्कराचे 400 जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी आज घटनास्थळाची पाहाणी करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. भीतीने गाव सोडून पळून गेलेल्या लोकांना परत आणण्‍यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहे. तसेच गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा, घटनेची छायाचित्रे...