आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Namo Sabir Celebrate, Gather Damage Control JD U

नरेंद्र मोदींच्या स्तूतीमुळे साबिर अलींना जेडी(यू)कडून बाहेरचा रस्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - जनता दलाचे (संयुक्त) राज्यसभा खासदार साबिर अली यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. साबिर अली यांच्या पक्षविरोधी कारवाईमुळे त्यांना निलंबीत करण्यात आले असल्याचे जदयूचे महासचिव के.सी.त्यागी यांनी सांगितले आहे.
साबिर अलींवर पक्षाने नरेंद्र मोदींची स्तूती केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई केली आहे. साबिर अली म्हणाले होते,'ज्याची नियत चांगली असेल त्याची केंद्रात सत्ता येईल. नरेंद्र मोदींना मी जवळून ओळखत नाही मात्र, लांबून तरी त्यांची नीती चांगल वाटत आहे' आज (सोमवार) सकाळीच त्यांनी हे वक्तव्य केले त्याचा परिणाम त्यांना तत्काळ भोगावा लागला आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या अली यांना पक्षाने शिवहर येथून लोकसभेची उमेदवारी दिली होती.
मोदींच्या स्तूतीमुळे पक्ष नेतृत्वावर अली नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. बिहारचे मुख्यमंत्री पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनीही फोन करुन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या कार्यपद्धतीवर साबिर नाराज होते. साबिर यांना निलंबीत केल्यानंतर त्यांनी पक्षातील कोणत्याही नेत्यावर टीका केलेली नाही. मात्र, नितीशकुमारांवर त्यांनी निशाणा साधला आहे.
जदयूचा अल्पसंख्यांक चेहरा म्हणून साबिर प्रसिद्ध आहेत. दिल्ली विधानसभेची संपूर्ण जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली होती. राज्यसभेची जागा पुन्हा देण्यास पक्षाने होकार दिला नसल्यामुळेही ते नाराज होते. जदयू मधून हकालपट्टी झाल्यानंतर आता ते भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.