- Marathi News
- Bihar News Patna Ashiana Nagar Today Get Punished Fake Encounter Case
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाटण्यातील बनावट चकमक प्रकरण : पोलिस निरीक्षकाला फाशी, 7 जणांना जन्मठेप
पाटणा - केवळ दोन रुपयांच्या टेलिफोन बिलाच्या वादात दरोडेखोर ठरवून तीन विद्यार्थ्यांची बनावट चकमकीत हत्या केल्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने पोलिस निरीक्षकाला फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 12 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात मंगळवारी निवाडा केला. कॉन्स्टेबलला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. पोलिस व 6 व्यापार्यांनाही यात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ही घटना 28 डिसेंबर 2002 ची आहे. विकास रंजन, प्रशांत आणि हिमांशू या विद्यार्थ्यांचा एसटीडी बूथचे मालक कमलेश यांच्याशी दोन रुपयांवरून वाद झाला. कमलेशने इतर व्यापार्यांच्या संगनमताने तिघांना बेदम मारहाण केली. पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक शेख आलम तेथे आले आणि व्यापार्यांशी संगनमत करून तीन विद्यार्थ्यांना बनावट चकमकीत ठार केले.
छायाचित्र : मुलाच्या एन्काउंटरचे दुःख आजही मारल्ये गेलेल्या विकासचे आई-वडिल विसरु शकलेले नाहीत.