आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Patna Aurangabad Road Accident Women Legislators Clash Police

PHOTOS:कावड यात्रेकरू अपघात वाद, महिला आमदाराने एसपींवर उगारली चप्पल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : एसपीवर चप्पल उगारणा-या डेहरी ऑन-सोनच्या आमदार ज्योती रश्मी व त्यांचे समर्थक.

औरंगाबाद/पटना - बिहारच्या आरंगाबादमध्ये नॅशनल हायवेवर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कावड यात्रेकरूंना ट्रॉलीने चिरडल्याने झालेल्या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर 18 जण गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर घटनास्थळावर मृतांच्या नातेवाईकांना अधिक नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करणा-या डेहरी ऑन-सोनच्या आमदार ज्योती रश्मि यांचा पोलिसांबरोबर बाद झाला. यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षक उपेन्द्र शर्मा यांच्यावर चप्पल उगारली. ज्योती रश्मी यांची मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख तर जखमींना 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी होती. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकाला अडीच लाख आणि जखमींना 50 हजारांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. ज्‍योती रश्‍म‍ी माजी आमदार प्रदीप जोशी यांच्या पत्नी आहेत.

अशी घडली घटना?
सोमवारी रात्री सुमारे तीन वाजता राष्ट्रीय महामार्ग-2 वर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कावडींना चिरडल्याने झालेल्या अपघातात 12 जण ठार झाले होते. तसेच जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सर्व कावडी पुजा करून परतत होते.

पुढे पाहा... घटनेशी संबंधित छायाचित्रे...