आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Patna Bihar Assembly Elections Semi Finals Today Both Leaders Prepare Public

मतदानाला प्रारंभ : लालू यादव-नितीशकुमारांचे भवितव्य आणि मोदी लाटेची परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये आज (गुरुवार) विधानसभेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली. राजनगर (सु.), छपरा, हाजीपुर, मोहिउद्दीननगर, मोहनिया, नरकटियागंज, जाले, परबत्ता, भागलपुर आणि बांका या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. मतमोजणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते लालू प्रसाद यादव आणि जनता दल संयुक्त (जेडीयू) यांची आघाडी आहे. यात काँग्रेस देखील आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांविरोधात लढणारे हे नेते लोकसभेत भाजपच्या विजयनंतर एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्या एकत्रिकरणाला जनता स्विकारते का, की लोकसभेतील मोदी लाट अजूनही कायम आहे. हे या पोटनिवडणूकीवरुन स्पष्ट होणार आहे.