आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Patna Bollywood Actress Neha Sharma\'s Father Won Election Bhagalpur

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माचे वडील बिहारमधील भागलपूरमधून विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागलपूर/पाटणा - बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत आरजेडी-जेडीयू-काँग्रेस महाआघाडीने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडविला आहे. महाआघाडीने 10 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. या पोटनिवडणुकीतही बॉलिवूडचे रंग पाहायला मिळाले होते. बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माचे वडील अजीत कुमार शर्मा यांनी भागलपूर येथून विजय संपादन केला आहे. ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. शर्मा यांनी भाजपचे उमेदवार नभय कुमार चौधरी यांचा पराभव केला.
अभिनेत्री नेहाने वडीलांचा प्रचार देखील केला होता. तिच्या सहभागानेच या निवडणुकीत बॉलिवूड सेलिब्रिटी दिसली होती. वडीलांचा प्रचार करताना नेहा म्हणाली होती, मी भागलपूरची मुलगी आहे. माझे वडील अजीत शर्मांसाठी तुमचे मत मागायला आले आहे. सो... प्लीज.. प्लीज... माझी विनंती आहे, की तुमचे अमुल्य मत माझ्या वडीलांनाच द्या. आज (सोमवार) झालेल्या मतमोजणीत मतदारांनी तिच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेहाने वडीलांसाठी केलेल्या प्रचाराची आणखी छायाचित्रे...