पाटणा - प्रसिद्ध लेखक
चेतन भगतवर '
हाफ गर्लफ्रेंड' कादंबरीवरुन प्रथमच वाङमय चौर्याचा आरोप झाला आहे. डॉ. बिरबल झा या इंग्रजी शिकविणार्या शिक्षकाने भगत यांच्यावर वाङमय चौर्याचा आरोप केला आहे. त्यांचा आरोप आहे, की भगत यांची कादंबरी माझ्या 'इंग्लिशिया बोली' या पुस्तकाच्या कथानकावर बेतलेली आहे. त्यांनी माझी कथा चोरली आहे.
डॉ. झा यांचा दावा आहे, की त्यांचे 'इंग्लिशिया बोली' हे पुस्तक चेतन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड' आधी प्रकाशित झाले होते. डॉ. बिरबल झा हे पाटण्यातील इंग्रजी शिकविणारी इन्स्टिट्यूट ब्रिटीश लिंग्वाचे संचालक आहेत.
'दिव्य मराठी नेटवर्क'सोबत बोलताना डॉ. बिरबल झा यांनी दावा केला, की या वर्षी जानेवारीमध्ये चेतन भगत त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. तेव्हा डॉ. झा यांनी त्यांचे 'इंग्लिशिया बोली' हे पुस्तक त्यांना भेट दिले होते. या पुस्तकात बिहारच्या एका गरीब विद्यार्थ्याची कथा आहे. त्याला इंग्रजी बोलता येत नाही. डॉ. झा यांनी सांगितले, की त्यांच्या कथेचा नायक चंद्रप्रसाद आहे. तो एक हुषार तरुण आहे. तो बिहारच्या एका छोट्या शहरात राहातो. तो दिल्लीला जातो, पण त्याला इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे तिथे त्याच्या समोर काही समस्या निर्माण होतात. त्यानंतर काही दिवसांनी त्याची अशा एका मुलीशी गाठ पडते, जिला उत्तम इंग्रजी येते. या पुस्तकातील नायक जेव्हा स्वतःला सिद्ध करतो, तेव्हा कथेच्या नायिकेचे त्याच्यावर प्रेम जडते.
डॉ. बिरबल झा यांचा आरोप आहे, की चेतन भगत यांच्या कादंबरीतही असेच कथानक आहे. हा एक योगायोग असू शकत नाही. त्यांनी चेतन भगतला कायदेशीर नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. याआधी बिहारमधील डुमराव येथील लोकांनी चेतन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड'च्या पुस्तकाची होळी केली होती. त्यांचे म्हणणे होते, की या पुस्तकात त्यांच्या गावाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले गेले. डुमराव येथील राज परिवारानेही चेतन भगत यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणाले डॉ. झा