आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Patna Maoists Blow Track Narrowly Escaped Rajdhani Exp

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे रूळ, राजधानी एक्सप्रेस थोडक्याच बचावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/पटना - बिहारच्या गया जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा भुवनेश्वर-राजधानी (अप) एक्सप्रेसचा अपघात थोडक्यात बचावला. नक्षलवाद्यांनी पूर्व-मध्य रेल्वेच्या गया-मुगलसराय रेल्वेमार्गावर इस्माइलपूर-रफीगंज स्थानकादरम्यानची पटरी स्फोटाच उडवली. त्यामुळे राजधानी एक्सप्रेसच्या पुढे असणा-या अ‍ॅडव्हांस पायलट इंजिन पटरीवरून खाली उतरले.
रेल्वेच्या अधिका-यांना वेळेत याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे राजधानी एक्सप्रेस थोडक्यात बचावली. परय्या स्थानकावर ती थांबवण्यात आली. देल्या महिन्यातही नवी दिल्लीहून डिब्रूगडला जाणारी राजधानी एक्सप्रेस (12236 अप) छपरा-गोल्‍डनगंज स्थानकादरम्यान पटरीवरून उतरल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले होते.

मोठा स्फोट झाला
नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट एवढा मोठा होता की, रेल्वे पटली सुमारे तीन मीटर लांब उडून पडली. स्फोटामुळे डाउन लाइनवरही परिणाम झाला. त्या ट्रॅकवरील वीजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे बुधवारी काळपर्यंत दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद होती.
प्रवशांमध्ये भीती आणि तणाव
स्फोटात डाऊन लाइनच्या वीजेच्या तारा तुटल्याने जोधपूर एक्रप्रेस घटनास्थळी थांबली. त्यामुळे प्रवाशांनी भीती आणि तणावामध्ये रात्र काढावी लागली. तारा तुटल्याने रेल्वेमध्ये वीज नव्हती त्यामुळे लोक घाबरलेले होते. घटनेच्या पाच तासांनंतर त्याठिकाणी रेल्वेपोलिस पोहोचले.

नक्षलवाद्यांचा बंद
नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या मदनपूरमध्ये पोलिस फायरिंग आणि त्यात झालेल्या एका महिलेच्या आणि मुलाच्या मृत्यूच्या विरोधात बंद पुकारला होता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा बंद सुरू झाला होता.
फोटो - स्फोटानंतर रेल्वे रूळाची अशी अवस्था झाली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा घटनेचे फोटो...