आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Patna Ram Vilas Paswan Broken During Speech

'मूल्य म्हणजे काय रे भाऊ', पासवान म्हणाले 'मत दिले त्याचेच काम होणार..'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाजीपूर/पटना - राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी 16 व्या लोकसभेला प्रथमच संबोधित केले. संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या सरकारचा प्राधान्यक्रम स्पष्ट करत सरकारचा अजेंडा सर्वांसमोर ठेवला. सरकार 'सबका साथ, सबका विकास' या मूल्याला सर्वोच्च मानून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण केंद्र सरकारचे मंत्री असणा-या रामविलास पासवान यांनी या मूल्याची ऐशी-तैशी करणारे एक वक्तव्य केले आहे.

मोदी सरकार कोणताही भेदभाव न करता देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विकसासाठी प्रयत्न करू शकेल का? अशी शंका अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरकार सर्वांसाठीच काम करणार असल्याचे मोदींनी वारंवार स्पष्ट करूनही हा प्रश्न उपस्थित होत आहे. एनडीएला मते म देणा-यांबाबत भेदभाव केला जाणार नसल्याचे मोदींनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही हा कानमंत्र दिला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी रविवारी हाजीपूर येथील एका सभेत एक वादग्रस्त वक्तव्य केले. काम घेऊन येणा-या लोकांनी मते कोणाला दिली हे आपण विचारणार आहोत. तसेच त्यांच्या परिसरात किती मते मिळाली, हे पाहूनच काम करणार असल्याचे पासवान म्हणाले.

पासवान म्हणाले, बूथ नंबर, त्याठिकाणी कोणाला किती मते मिळाले त्या आधारावर कामाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या सभेत पासवान यांनी मतांबाबत अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली.

फोटो : रविवारी हाजीपूरच्या अक्षयवट राय स्टेडियममध्ये खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामविलास पासवान यांच्या भाषणाच्या वेळी व्यासपीठ कोसळले होते. त्यामुळे कार्यक्रम अर्ध्यातच बंद करावा लागला. पण यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.

पुढे वाचा - का झाले मोदी अस्वस्थ...