पाटना - वाढत्या बलात्काराला आळा घालण्यासाठी मुलींनी रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये, परपुरुषाला लिफ्ट मागू नये असे विधान जदयुचे आमदार संजय सिंह यांनी केले. तसेच बिहारमध्ये बलात्कार कमी झाले असल्याचेही त्याने सांगितले. विरोधी पक्षातील नेते असे बिनबुडाचे आरोप करत असतात पण असे काही एक नाही.
तत्पूर्वी गुरुवारी रात्री पाटनामधील करबिगहिया मध्ये एका मुलीवर टॅक्सीमध्ये आणि एका निर्जण परिसरामध्ये वेगवेगळया ठिकाणी झालेल्या बलात्कारावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
पोलिसांची दिरंगाई
पिडीत मुलीवर टॅक्सीमध्ये बलात्कार केल्यानंतर नराधमांनी तिला रत्यावर अर्धनग्न अवस्थेत सोडून दिले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पिडीत मुलीला घरी सोडून दिले होते. पण आरोपींचा तपास केला नाही. जेव्हा ही बातमी प्रभारी एसपी पी कन्नन यांना कळली तेव्हा त्यांनी ठाणेदाराला फटाकारले आणि पिडीत मुलीचे बयान घ्यायला सांगितले.
(फाईल फोटो - संजय सिंह)