आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bihar News Photos Of Chapra Railway Accidents Rajdhani Express

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरुवातीला वाटले भूकंप आला, नंतर मोठा आवाज झाला आणि गाडी अचानक थांबली!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- नवी दिल्लीहून डिब्रूगढला जाणारी नवी दिल्ली-डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेस (12236) छपरा-गोल्‍डनगंज स्टेशन रुळावरून घसरली. मंगळवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडली. अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले असून आठ प्रवासी जखमी आहेत.

राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणारे प्रवाशी विक्रमजीत सिंह यांनी सांगितले, की सुरुवातीला वाटले भूकंप आला. परंतु मोठा आवाज झाला आणि गाडी अचानक जागेवरच थांबली. प्रथम श्रेणीच्या एच1 डब्यातून प्रवास करणार्‍या विक्रमजीत आणि त्यांच्यासोबतच्या प्रवाशांना काय झाले हे कळलेच नाही. बी1 पासून बी7 बडे रुळावरून घसरल्याचे समजले. नंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली. त्यात रात्रीची वेळ. लखनौहून टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर विक्रमजीत गुवाहाटी येथे जात होते. पाटणा पोहोचल्यानंतर त्यांनी 'दैनिक भास्‍कर'च्या कार्यालयात येऊन 'आंखों देखा हाल' कथन केले.

विक्रमजीत म्हणाले की, मोठा आवाज झाल्यानंतर गाडीला कोणी तरी ओढत असल्याचा भास होत होता. गाडीतील सगळे प्रवाशी भयभीत झाले होते. सर्वजन परमेश्वराची मनात आराधना करत होते. नंतर एकच गोंधळ उडाला. अपघात झाल्याने प्रवाशी धावपळ करत होते। विक्रमजीत यांच्या डब्यातील कोणत्याही प्रवाशाला सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु भीतीमुळे सगळ्याच भेदरले होते. सर्वत्र काळोख पसरला होता. डब्यातून उतरून सगळे प्रवाशी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत होते. काही एकमेकांची मदत करत होते. आम्ही अन्य प्रवाशांच्या बॅगा रेल्वेतून खाली उतरवल्याचे विक्रमजीत यांनी सांगितले.

पहाटे चार वाजेच्या सुमारास डीएम व एसपी यांच्या नेतृत्त्वाखाली बचावपथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातात वेटर्स मोठ्याप्रमानात जखमी झाले आहेत. ते बाथरूमजवळ झोपले होते. दरवाजा धडकून बहुतेक वेटर्स जखमी झाले.

'आम्ही सुखरुप असल्यावर विश्वास बसत नाही'
नवी दिल्लीहून गुवाहाटी आपल्या घरी परतणारे कुशल म्हणाले, की आम्ही सुखरुप असल्यावर विश्वास बसत नाही. कुशल बी-6 क्रमाकांच्या डब्यातून प्रवास करत होते. हा डबा रुळावरून घसला होता.
दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटन्सीचे शिक्षण घेणार्‍या कुशलने सांगितले, की राजधानी एक्स्प्रेस आपल्या गतीने धावत होती. रात्रीचे दोन वाजले होते. सगळे झोपले होते. कुशल आपल्या आयफोनवर काम करत होते. अचानक मोठा आवाज झाला. इंजिन अचानक थांबले. इंजिनवर मागील डबे जोरात आदळले. आमचा डबा रुळावरून घसरून खडीमधे गेला। डबाला जोरात झटका बसताच डब्यात झोपलेले प्रवाशी खाली पडले. सगळं इतकं अचानक घडले, की कोणालाच काही समजले नाही. नंतर गोंधळ सुरु झाला. सर्वत्र अंधार होता. कोणाचा सामान कुठे हेही कळत नव्हते. प्रत्येक जन आपला जीव वाचवण्यासाठी धाडपड करत होता. महिला रडत होत्या. डब्यात एक कॅन्सरचा रुग्ण होता. तसेच एक हृदय रूग्णही होता. त्याच्या ह्रदयात पेसमेकर बसवले होते. सगळे घाबरले होते. सगळे परमेश्वराचे नाव घेत होते. मात्र सुदैवाने आम्ही ज्या डब्यात होतो. तो डब उलटला नाही. मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात आम्ही अन्य प्रवाशांची मदत करू लागलो. इंजिनमागील जनरेटरच्या डब्यापासून पेंट्री कार व बी-8 क्रमांकाचा डबा रुळावरून घसरले होते. अपघातानंतर जवळपास दोन-अडीच तासांनंतर बचावपथक घटनास्थळी पोहोचले.

पाटणा येथील 'दैनिक भास्कर'च्या कार्यालयात पोहोचून कुशलने ही माहिती दिली. कुशल आई-वडिलांना भेटण्यासाठी गुवाहाटीला येत होता.

पुढील स्लाइड्‍सवर स्‍लाइड्स पाहा घटनास्‍थळचा छायाचित्रे आणि अपघातग्रस्त राजधानी...
(फोटो:राजधानी एक्‍स्प्रेसमधील प्रवाशी विक्रमजीत सिंह)