आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Ram Vilas Appearfirst Time Stage With Namo Narendra Modi

\'मोदींना विरोध\', हाच कॉंग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा; मोदी- रामविलास एका व्यासपीठावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर / पाटणा- 'मी देशातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना विरोधकांना मात्र माझी चिंता लागली आहे. देशातील जनतेच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे त्या सोडविणे देशातील सत्ताधारी सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सरकारला देशातील जनतेचा विसर पडला आहे. 'मोदी रोको', हाच कॉंग्रेस पक्षाने पाढा लावला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कॉंग्रेस राजकारण करत आहे. मात्र आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे विकासाचा मार्ग आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे जोडा आणि विकास करा, असे धोरण आहे. भाजप कोणताही भेद करत नाही. देशातील जनतेच्या प्रश्नावर कॉंग्रेसकडे उत्तर नाही. केवळ मोदी विरोध हाच कॉग्रेसचा अजेंडा बनला असल्याचा आरोप मोदींनी केला.

12 वर्षांपूर्वी लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी नरेंद्र मोदींमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) फारकत घेतली होती. मात्र पासवान आणि मोदी आज (सोमवारी) एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले दिसले. पासवान यांनी मोदींची भरभरून प्रशंसाही केली. मोदींनीही पासवान यांना आपले जुने मित्र म्हणून संबोधले. एवढेच नव्हे तर पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांचा युवा नेता म्हणून गौरव केला.

मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. मोदींनी यावेळी 'सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने नहीं दूंगा' ही कविता सादर केली. सभांना सुरक्षा ‍दिली जात नसल्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. एवढेच नाही तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी लोखंड देण्याचे आवाहनही केले. यानंतर मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

शांती, एकता आणि सदभावनेशिवाय देश विकास करू शकत नाही. त्यामुळे आगामी दशक हे विकासाचे दशक असणार आहे. दलित, पीडित, शोषित यांचा आगामी दहा वर्षांत विकास करणार असल्याचे आश्वासन मोदींनी यावेळी दिले.