आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Vaishali Family Shot Four People Standing Line

आधी आईच्या प्रियकराची केली हत्या, आता त्याच्या घरातील लोकांना घातल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाजीपूर- जुन्या वैमनस्यातून एका युवकाने व त्याच्या सहका-यांनी एका कुटुंबियातील लोकांना लाईन लावून गोळ्या झाल्या. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याचे वडील, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मुलीने यातून आपली सुटका करून जीव वाचविला आहे. तसेच मुलगा घरी नसल्याने त्याचाही जीव वाचला आहे. आरोपींनी हे कृत्य करून घटनास्थळावरून पळ काढत फरार झाले आहेत. याच आरोपीने मागील वर्षी आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केली होती. आता तो त्याच्या परिवाराला मारण्याचा प्रयत्न करीत आहे.
घटना हाजीपुर जिल्ह्यातील राजापाकड पोलिस ठाण्यातील चौरी गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौरी गावात राहणारा युवक सोनू राय याने बुधवारी सायंकाळी आपल्या चार सहका-यांसह विश्वनाथ राय यांच्या घरी पोहचला व त्याने त्यांचा मुलगा चंदन याला आवाज दिला. चंदन त्यावेळी घरी नव्हता. राय यांची मुलगी अंजु कुमारी हिने सांगितले की, सोनूने घरातील सर्व सदस्यांना लाईनमध्ये उभे केले व गोळ्या झाडायला सुरुवात केली. सोनू आणि त्याच्या सहका-यांनी प्रथम वडील विश्वनाथ राय यांना गोळी मारली. नंतर आई व आजोबा यांनी गोळ्या घातल्या. मात्र, त्याचवेळी पळून गेले व जीव वाचवला.
विश्वनाथ राय हे एक वर्षापूर्वी सोनूने मारल्या गेलेल्या रामनाथ राय यांचा मोठा भाऊ होते. रामनाथ राय सोनूच्या आईचा प्रियकर होता. 2005मध्ये जेव्हा आरोपी सोनू केवळ 8 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई घरातील सर्वांना सोडून रामनाथ रायसोबत पळून गेली होती. दोघांनी पंजाबमध्ये जाऊन लग्न केले होते. सोनू जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने राय यांच्या कुटुंबियांनाच संपविण्याचा विडा उचलला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातच सोनूने रामनाथ याची हत्या केली होती.