आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये पोटनिवडणुकीत लालू-नितीश युतीचा नरेंद्र मोदी लाटेला ब्रेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- युद्धात विजयासाठी शत्रूच्या शत्रूंशीही हातमिळवणी करावी लागते. बिहारमध्ये भाजपच्या पराभवासाठी दोन दशकांची दुश्मनी विसरून लालू-नितीश यांनी हाच मार्ग
अवलंबला. सोमवारी पोटनिवडणुकांचे निकाल लागल्यावर त्याची फलश्रुतीही दिसली. राजद-जदयू-काँग्रेसच्या महायुतीने १० पैकी ६ जागा जिंकल्या. गर्तेत सापडलेल्या
काँग्रेससाठी हे निकाल उत्साह वाढवणारे ठरले. लोकसभेत नीचांक गाठणाऱ्या काँग्रेसने बिहारसह मध्य प्रदेश, पंजाब व कर्नाटकातील जागा जिंकत राजकारणात परतीचे
संकेत दिले.

नितीश : देशात फूट पाडणाऱ्या शक्तींना जनतेने नाकारले अाहे.
भाजप : निवडणुकीत स्थानिक मुद्दे, निकाल मोदींविरोधात नाहीत.

बिहार - १० जागा
भाजप ४ (-२)
राजद ३ (०)
जदयू २ (+१)
काँग्रेस १ (+१)

मध्य प्रदेश - ३ जागा
भाजप २ (०)
काँग्रेस १ (०)

कर्नाटक - ३ जागा
काँग्रेस २ (+१)
भाजप १ (-१)

पंजाब- २ जागा
अकाली १ (+१)
काँग्रेस १ (-१)